अ‍ॅपशहर

दहिसर नदीपात्रात पुन्हा मेलेली गुरे

दहिसर नदीच्या काठावरील हायवेजवळच्या श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समधील रहिवाशांना गुरुवारी सकाळी नदीपात्रात मेलेली गुरे आढळून आली. त्यांनी तातडीने याची माहिती महापालिकेलाही दिली. तरीही ही गुरे बाहेर न काढल्याने ती पाण्याबरोबर वाहून गेली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Maharashtra Times 21 Jul 2017, 4:00 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dead cattles in dahisar river
दहिसर नदीपात्रात पुन्हा मेलेली गुरे

दहिसर नदीच्या काठावरील हायवेजवळच्या श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समधील रहिवाशांना गुरुवारी सकाळी नदीपात्रात मेलेली गुरे आढळून आली. त्यांनी तातडीने याची माहिती महापालिकेलाही दिली. तरीही ही गुरे बाहेर न काढल्याने ती पाण्याबरोबर वाहून गेली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दोन मेलेली गुरे नदीत आढळल्यानंतर काही वेळातच दोघे नदीपात्रात उतरलेले रहिवाशांना आढळले. ते रात्री अंधारात पाण्यात टाकलेली गुरे प्रवाहात ढकलत असावेत, असा स्थानिकांचा अंदाज आहे. प्रत्येक पावसाळ्यात अशा घटना समोर येतात. या आधीही पाण्याच्या प्रवाहामध्ये मेलेली गुरे फेकण्याचे प्रकार घडले आहेत. पावसाळ्यात नदीच्या प्रवाहाला वेग असतो, त्यामुळे मेलेली गुरे वाहून जातात व कोणाच्या लक्षात येत नाही, असे श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स समितीचे सदस्य दीपेन देसाई यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज