अ‍ॅपशहर

सेल्फी काढताना किल्ल्यावरुन पडून तरूणीचा मृत्यू

वांद्रे परिसरातील बँडस्टँड येथे किल्ल्याच्या भिंतीवर कडेला उभे राहून सेल्फी काढण्याची हौस मीनाक्षी राजेश (२१) या तरुणीच्या जिवावर बेतली. ती मुंबई दर्शनासाठी कुटुंबीयांसोबत आली होती.

Maharashtra Times 4 May 2017, 1:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम death of a young girl falls off fort when click selfie
सेल्फी काढताना किल्ल्यावरुन पडून तरूणीचा मृत्यू


वांद्रे परिसरातील बँडस्टँड येथे किल्ल्याच्या भिंतीवर कडेला उभे राहून सेल्फी काढण्याची हौस मीनाक्षी राजेश (२१) या तरुणीच्या जिवावर बेतली. ती मुंबई दर्शनासाठी कुटुंबीयांसोबत आली होती.

तामिळनाडूच्या मथामिल नगरच्या मुदुराई येथील राहणारी मीनाक्षी राजेश तिच्या कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी ३० एप्रिल रोजी मुंबईत आली होती. १ मे रोजी मीनाक्षी आणि तिचे कुटुंबीय वांद्रे किल्ला पाहण्यासाठी आले. दुपारची वेळ असल्याने किल्ल्याजवळील दगडांवर बसून मीनाक्षी आणि तिचे कुटुंबीय जेवत होते. त्यावेळी मीनाक्षी समुद्रातील दगडांवर चढून सेल्फी घेत होती. त्यावेळी आलेल्या लाटेने मीनाक्षीला समुद्रात ओढून नेले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज