अ‍ॅपशहर

ईद बंदोबस्तातील पोलिसाचा मृत्यू

ईदनिमित्त एल्फिन्स्टन रोड येथे बंदोबस्तावर असलेले ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल यशवंत नाईक (४२) यांचा शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

Maharashtra Times 17 Jun 2018, 1:49 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police2


ईदनिमित्त एल्फिन्स्टन रोड येथे बंदोबस्तावर असलेले ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल यशवंत नाईक (४२) यांचा शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

डिस्पॅच रायटर म्हणून कार्यरत असलेले यशवंत नाईक हे ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याजवळील पोलिस वसाहतीमध्ये राहत होते. शनिवारी एल्फिनस्टन रोड येथील फितवाला हॉल परिसरात त्यांची ड्युटी होती. ड्युटीवर असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी पाणी मागितले. पाणी पीत असतानाच ते कोसळले. त्यांना तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. यशवंत याच्या पश्चात पत्नी, १२ वर्षाची मुलगी आणि ७ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. कमावता आधार गेल्यामुळे नाईक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ईद साजरी झाली नाही

ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अहमद पठाण यांना सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून बढती मिळाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात खास जेवणाची व्यवस्था केली होती. मात्र, नाईक यांच्या मृत्यूमुळे पोलिस ठाण्यात ईद साजरी करण्यात आली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज