अ‍ॅपशहर

मनी लाँड्रिंग प्रकरण : देशमुखांच्या जामिनावर आज होणार निर्णय

२ नोव्हेंबर २०२१ रोजी दीर्घ चौकशीअंती ईडीने त्यांना अटक केली. ईडीने या प्रकरणी तपासाअंती न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देत देशमुख यांनी अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत जामीन अर्ज केला आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 4 Oct 2022, 8:28 am
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मिळणार की नाही, याचा निर्णय आज, मंगळवारी दुपारी होणार आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील राखून ठेवलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आज देणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anil deshmukh
देशमुखांच्या जामिनावर आज निर्णय


भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर त्याआधारे सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख हे मागील ११ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. २ नोव्हेंबर २०२१ रोजी दीर्घ चौकशीअंती ईडीने त्यांना अटक केली. ईडीने या प्रकरणी तपासाअंती न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देत देशमुख यांनी अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत जामीन अर्ज केला आहे.

हा अर्ज जवळपास सात महिन्यांपासून प्रलंबित राहिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाला लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करून निर्णय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार न्या. जमादार यांनी दोन दिवस सलग सुनावणी घेऊन २८ सप्टेंबर रोजी ती पूर्ण करत निर्णय राखून ठेवला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज