अ‍ॅपशहर

बच्चन तो बच्चन है!

बच्चन तो बच्चन है साब. इसलिये उनकी किताबें हम सबसे उपर रखते है. उनका बार्गेनिंग भी ज्यादा नहीं होता. क्यो की लेनेवाले को भी पता होता है की, वो बच्चन साथ ले जा रहे है. सब से ज्यादा डिमांड बच्चन साब की ही होती है.

Maharashtra Times 11 Oct 2016, 3:42 am
मुंबई बी-टाऊन बुक्समध्येही ‘बिग बी’ अग्रेसर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम demand for amitabh bacchans books
बच्चन तो बच्चन है!


mrinmayi.natu@timesgroup.com

मुंबईः ‘बच्चन तो बच्चन है साब. इसलिये उनकी किताबें हम सबसे उपर रखते है. उनका बार्गेनिंग भी ज्यादा नहीं होता. क्यो की लेनेवाले को भी पता होता है की, वो बच्चन साथ ले जा रहे है. सब से ज्यादा डिमांड बच्चन साब की ही होती है,’ हे उद्गार आहेत, हुतात्मा चौकात रस्त्यालगत पुस्तके विकाणाऱ्या एका विक्रेत्याचे. आज मोठमोठाल्या मॉल्समध्ये पुस्तकांची एसी दुकाने उभी राहिली आहेत. ‌दिलीपकुमारांपासून चेतन भगतपर्यंत अनेक पुस्तके आली. पण बिग बींच्या पुस्तकांची मागणी कधीच कमी झाली नाही, हेच या विक्रेत्यांशी बोलताना जाणवते.

या रस्त्यांवर बहुतांश सेकंड हँड पुस्तके विकली जातात. त्यात काही नवी कोरी पुस्तकेही असतात. पुस्तकांची आवड असलेले मुंबईतले तरुण इथे येऊन स्वस्तात पुस्तक खरेदी करतात. या तरुण वाचकांमध्येही बिग बींना प्रचंड मागणी आहे.

हुतात्मा चौकसमोर असलेल्या सर्वांत मोठ्या ओपन बुक मार्केटमध्ये एक फेरफटका मारल्यानंतर पुस्तकांचे गठ्ठे दिसतात. या गठ्ठ्यांमध्ये, प्रत्येक विक्रेत्याकडे उठून दिसतात ती अमिताभ बच्चन यांचे फोटो असलेली पुस्तके. ‘बिग बींच्या पुस्तकांना इथे प्रचंड मागणी आहे. अनेक विक्रेते दिवसाला बच्चन यांची डझनावारी पुस्तके विकतात,’ अशी माहिती मुंबई नॉवेल बुक वेल्फेअर असोसिएशनचे खजिनदार राजेंद्र चंडेल यांनी दिली. आजही दिवसाला विकल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये किमान चार पुस्तके बिग बींची असतात, अशी माहिती फोर्टमधल्या एका पुस्तक विक्रेत्याने दिली.

या पुस्तकांची किंमत आठशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामध्ये विशेषतः खालिद महोम्मद लिखित 'टू बी ऑर नॉट टू बी : अमिताभ बच्चन', भावना सोमय्या लिखित 'अमिताभ बच्चन: द लिजंड' आणि जेसिका हाईन्स लिखित 'लूकिंग फॉर द बिग बी' या तीन कॉफी टेबल बुक्सच्या पठडीत मोडणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे. खालिद यांनी लिहिलेले पुस्तक ‘बिग बीं’च्या ६०व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आले होते. यात बच्चन यांचे दुर्मिळ फोटो आहेत. तर सोमय्या यांनी त्यांच्या पुस्तकात बच्चन यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. ‘बिग बीं’च्या खालोखाल दिलीपकुमार, देवानंद, रजनीकांत यांच्या पुस्तकांना मागणी असल्याचे चंडेल सांगतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज