अ‍ॅपशहर

'लालबागचा राजा'ला सोन्याची मूर्ती दान

परळमधील 'लालबागाचा राजा' गणपतीला दरवर्षी भाविक भरभरून दान देतात. यावर्षीही एका भाविकाने चक्क बाप्पाला त्याचीच सोन्याची प्रतिकृती दान केली आहे. ही सोन्याची मूर्ती भरीव असून तीची किंमत तब्बाल ४२ लाख रुपये इतकी आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2018, 3:41 pm
मुंबईः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganpati


परळमधील 'लालबागाचा राजा' गणपतीला दरवर्षी भाविक भरभरून दान देतात. यावर्षीही एका भाविकाने चक्क बाप्पाला त्याचीच सोन्याची प्रतिकृती दान केली आहे. ही सोन्याची मूर्ती भरीव असून तीची किंमत तब्बाल ४२ लाख रुपये इतकी आहे. तसंच मूर्तीच्या मुकुटात हिराही आहे. राजाच्या दर्शनासाठी भविकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे अवघ्या पाच दिवसात 'लालबागचा राजा'च्या चरणी २ कोटी ६४ लाखांचं दान जमा झालं आहे.

'लालबागचा राजा'ला अर्पण केलेली त्याची सोन्याची प्रतिकृती ही १ किलो २७१ ग्रॅमची आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती भरीव आहे. अतिशय आकर्षक अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीच्या मुकुटात हिरा आहे. हा हिरा अंदाजे १ लाख रुपयांचा असल्याचं सांगण्यात येतंय.

गेल्या वर्षीही एका भाविकाने ३१.५ लाखाची सोन्याची गणेश मूर्ती 'लालबागचा राजा'ला अर्पण केली होती. गेल्या वर्षी भाविकांनी 'लालबागचा राजा'ला ६.७५ कोटींचे दान दिले होते. यात सोने आणि चांदीच्या मूर्तीसह दागिन्यांचा समावेश होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज