अ‍ॅपशहर

mahesh manjrekar : ३५ कोटी दे; महेश मांजरेकरांना अबू सालेमच्या नावाने खंडणीसाठी धमकी

चित्रपट निर्माते महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांना ३५ कोटींसाठी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी एका तरुणाला रत्नागिरीतून (ratnagiri) अटक करण्यात आली असून खंडणी विरोधी पथक अधिक तपास करत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Aug 2020, 12:38 pm
मुंबई: प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने ही धमकी देण्यात आली असून मांजरेकरांकडून ३५ कोटींची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mahesh manjrekar


महेश मांजरेकर यांना व्हॉट्सअॅपवरून गेल्या दोन दिवसांपासून धमकीचे मेसेज येत होते. त्यांना ३५ कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी केली जात होती. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या नावाने ही धमकी दिली जात असल्याने मांजरेकर यांनी काल खंडणीविरोधी पथकाकडे जाऊन तक्रार नोंदवली. यावेळी खंडणीविरोधी पथकाला सर्व मेसेज दाखवून धमकी येत असलेल्या मोबाइलचा नंबरही देण्यात आला. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने तात्काळ कार्यवाही करत रत्नागिरीतून एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचा अबू सालेमशी काही संबंध आहे का?, धमकी देण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.

महत्वाचे लेख