अ‍ॅपशहर

उमेदवारीची घोषणा काँग्रेसला काही पटेना; अमोल किर्तीकरांवरून काँग्रेस अन् आघाडीत धुसफूस

Amol Kirtikar : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांना आव्हान देण्यासाठी ठाकरे यांनी अमोल यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये उत्साह तर काँग्रेसमध्ये नाराजी आहे.

Authored byसौरभ शर्मा | Edited by किशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स 25 May 2023, 7:20 am
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांचे नाव जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amol kirtikar
अमोल किर्तीकरांवरून काँग्रेस अन् आघाडीत धुसफूस


आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपापले मतदारसंघ बांधण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी लवकरच तिन्ही पक्षांचा समावेश असलेल्या नऊ जणांची समिती स्थापन केल्यानंतर जागावाटप निश्चित करण्यात येणार आहे. मात्र, तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जागावाटपात आपले पारडे जड असल्याचे अधोरेखित करण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यातच ठाकरे यांच्या पक्षाकडून लोकसभानिहाय मतदासंघाचा आढावा घेण्याचे काम सुरू असून काही दिवसांपूर्वी उत्तर पश्चिम मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले.

जागावाटप निश्चित झालेले नसताना याबाबत घोषणा झाली कशी, असा प्रश्न निरूपम यांनी काँग्रेस प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत उपस्थित केला. निरूपम देखील या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. ‘तुमचा खासदार सोडून गेला आहे. त्यानंतर तुम्ही याठिकणी दावा कसा करू शकता’, असा प्रश्न उपस्थित करत निरूपम यांनी ‘मटा’शी बोलताना नाराजी नोंदवली.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची प्रकृती बिघडली; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे भेटीसाठी हिंदुजा रुग्णालयात
‘क्षमतेवर आधारित जागावाटप झाले पाहिजे. त्या मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतो? कुणाला संधी द्यायला हवी, हे मत विचारात घ्यायला हवे. त्यानंतरच घोषणा करायला हवी. आपण आघाडीत लढताना जागांची आदलाबदल केली पाहिजे’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महत्वाचे लेख