अ‍ॅपशहर

​ मंत्रीमहोदय, जरा तोंड सांभाळून!

डॉक्टरांची सुरक्षितता, आरोग्य, प्रवेशपरीक्षा अशा असंख्य प्रश्नांचे घोंगडे भिजत पडलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Maharashtra Times 27 Dec 2017, 1:36 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम doctors reply to mos hansraj ahir comment
​ मंत्रीमहोदय, जरा तोंड सांभाळून!


डॉक्टरांची सुरक्षितता, आरोग्य, प्रवेशपरीक्षा अशा असंख्य प्रश्नांचे घोंगडे भिजत पडलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

‘मी रुग्णालयात येणार हे माहीत असूनही डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारू,’ असे विधान अहिर यांनी चंद्रपूर येथे केले होते. या विधानाचा जन आरोग्य अभियानाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयात सोमवारी अमृत दिनदयाल मेडिकल स्टोअरचा शुभारंभ करताना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी हे उद्गार काढले होते.

सरकारी आरोग्य व्यवस्थेत डॉक्टर मंडळी येण्यास अगोदरच राजी नसतात. जे डॉक्टर्स सरकारी सेवेत आहेत त्यांना जर मंत्री-महोदय अशा हिंसक, अतिरेकी भाषेत धमक्या देत असतील तर त्याचा डॉक्टर समूहाच्या मनोबलावर विपरीत परिणाम होईल, भविष्यात नवीन डॉक्टर सरकारी सेवेत आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते, या शब्दांत जनआरोग्य अभियानाने तीव्र आक्षेप नोंदवला.

संबंधित डॉक्टर अधिकारी हे नियमबाह्य पद्धतीने अनुपस्थित राहिले असतील तर त्यांच्यावर सनदशीर पद्धतीने कारवाई करण्यास मंत्र्यांनी सूचना द्यायला हव्या होत्या. त्या ऐवजी ‘डॉक्टरांनी नक्षलवादी व्हावे, गोळ्या घालतो’ ही भाषा मंत्र्यांनी वापरणे अतिशय गैर आहे. जर मंत्रीच असे बोलू लागले तर उद्या सर्वसामान्य जनताही कायदा हातात घ्यायला आणि रुग्णालयांवर आणखी हल्ले करायला घाबरणार नाही, असा उद्वेग डॉ. अभिजित मोरे यांनी व्यक्त केला. यापुढे हंसराज अहीर यांनी अशी असंसदीय भाषा वापरू नये असे जाहीर आवाहनही त्यांना केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज