अ‍ॅपशहर

कंत्राटदाराला पालिकेचा दट्ट्या

म टा...

Maharashtra Times 14 Jun 2018, 4:00 am

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

वांद्य्रातील रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने काळ्या यादीत का टाकले जाऊ नये, अशी नोटीस जारी केली आहे. या कामांचा वाईट अनुभव लक्षात घेता, या कंपनीला मिळालेले परिमंडळ-३मधील खड्डेदुरुस्तीचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत मागे घेतला आहे.

वांद्रे पश्चिम येथील सेंट अँड्य्रू रोडसह मेहबूब चौक येथील रस्त्यांचे काम मनदीप एंटरप्रायझेस या कंत्राटदाराला देण्यात आले होते. ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने अभिनेता फरहान अख्तर यांनी ट्विटरवरून पालिकेच्या कारभारावर टीका केली होती. त्यावर वांद्रे येथील काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी स्थायी समितीत आवाज उठवून कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाकडे लक्ष वेधले होते. याप्रकरणी रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी या भागाची पाहणी करून पालिकेला अहवाल दिला आहे.

कंत्राटदाराला वांद्रे पश्चिम येथील विविध रस्त्यांची पावसाळापूर्वीची कामे पालिकेने दिली होती. ही कामे निकृष्ट दर्जाची असून, कामात नियोजनाचा अभाव आणि अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्याने कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी खड्डयांच्या कामांच्या कंत्राटाचा प्रस्ताव मागे घेतला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज