अ‍ॅपशहर

धोनी निवृत्तीचा विचारही मनात आणू नकोस: लतादीदी

विश्वचषक सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला निवृत्त न होण्याची विनंती केली आहे. निवृत्त होण्याचा विचारही मनात आणू नकोस, असा सल्लाही लतादीदींनी धोनीला दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jul 2019, 3:21 pm
मुंबई: विश्वचषक सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला निवृत्त न होण्याची विनंती केली आहे. निवृत्त होण्याचा विचारही मनात आणू नकोस, असा सल्लाही लतादीदींनी धोनीला दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lata-dhoni


लता दीदींनी एक ट्विट करून धोनीला हा सल्ला देतानाच त्याची भारतीय क्रिकेटला नितांत गरज असल्याचंही म्हटलं आहे. 'धोनी तुम्ही निवृत्त होणार असल्याचं मी ऐकलंय. कृपया करून असा विचार मनात आणू नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही निवृत्त होण्याचा विचार मनातून काढून टाका. माझी ही तुम्हाला व्यक्तिगत विनंती आहे,' असं लतादीदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी लतादीदींनी प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचं 'अकाश के उस पार भी' हे गाणं टीम इंडियाला ट्विटद्वारे समर्पित केलं आहे.



महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज