अ‍ॅपशहर

आयटी इंजिनीअर व्हायचं स्वप्न

म टा वृत्तसेवा, शहापूरशहापूर तालुक्यातील कळभे येथील दिशाला दहावीत ९४ टक्के गुण मिळाले आहेत दिशाला गणित आणि हिंदी विषयात उत्तम गती आहे...

Maharashtra Times 30 Jun 2018, 11:23 am
म. टा. वृत्तसेवा, शहापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम disha


शहापूर तालुक्यातील कळभे येथील दिशाला दहावीत ९४ टक्के गुण मिळाले आहेत.

दिशाला गणित आणि हिंदी विषयात उत्तम गती आहे. दिशाला हिंदीमध्ये नववीत ८० पैकी ७९ गुण मिळाले. पैकीच्या पैकी गुण देता येत नाहीत म्हणून तो एक गुण तिला दिला नाही, असे तिच्या शिक्षकांनी तिला सांगितले होते. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत शाळा असे. दिशाची अभ्यासातील गती पाहून एका क्लासने तिला फीमध्ये काही सवलत दिली. हा क्लास सायंकाळी सहापर्यंत असे आणि मग घरी आल्यावर थोडी विश्रांती घेऊन ती रात्री ११पर्यंत ती अभ्यास करत असे. दहावीत गणितात तिला १०० पैकी ९८ गुण मिळाले.

दिशाला आर्थिक पाठबळ मिळाले तर आई वडिलांचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास ग. वि. खाडे विद्यालयाच्या कार्यकारी मंडळाच्या सचिव विद्या वेखंडे यांनी व्यक्त केला. अकरावीत सायन्सला प्रवेश घेऊन नंतर आयटी इंजिनीअर होऊन दिशाला आपल्या आई-वडिलांची ओढाताण थांबवायची आहे.

कष्टाचं 'बाक'

दहावीत पहिले सहा महिने दिशा जमिनीवर बसून अभ्यास करायची. पाठ, मान भरून यायची. पण आठवीत दसताना तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. त्यात ती चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाली होती. शिष्यवृत्तीची रक्कम तिला दहावीत असताना नोव्हेंबरमध्ये मिळाली. त्यामधून तिने एक बाक विकत घेतला. नंतर ती त्यावर बसून अभ्यास करू लागली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज