अ‍ॅपशहर

'अर्जुन'विजेत्या नेमबाजाला रिक्षाचालकाने लुटले

देशाच्या क्रीडा क्षेत्रातील मानाच्या अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलेले नेमबाज अशोक पंडित यांच्याकडून दिल्लीतील एका रिक्षावाल्यानं २ लाख ४० हजार रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या तीन साथीदारांच्या मदतीनं रिक्षावाल्यानं पंडित यांना गंडा घातला.

Maharashtra Times 16 Oct 2016, 11:30 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम driver jumped out arjuna awardee left on his own in auto
'अर्जुन'विजेत्या नेमबाजाला रिक्षाचालकाने लुटले


देशाच्या क्रीडा क्षेत्रातील मानाच्या अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलेले नेमबाज अशोक पंडित यांच्याकडून दिल्लीतील एका रिक्षावाल्यानं २ लाख ४० हजार रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या तीन साथीदारांच्या मदतीनं रिक्षावाल्यानं पंडित यांना गंडा घातला आणि चालत्या रिक्षातून उड्या मारून सगळे पसार झाले. त्यानंतर पंडित यांनी कशीबशी रिक्षा थांबवल्यानं मोठा अपघात टळला.

मुंबईचे रहिवासी असलेले ६३ वर्षीय अशोक पंडित गेल्या गुरुवारी दिल्लीला गेले होते. नोएडाला जाण्यासाठी ते स्टेशनबाहेर टॅक्सीची वाट बघत होते. इतक्यात एक रिक्षावाला त्यांच्याजवळ आला आणि ५० रुपयांत नोएडाला न्यायला तयार झाला. आणखी दोन-तीन प्रवासी घेण्याबाबत त्यांनी पंडित यांना विचारलं. त्यांनी त्याला होकार दिला. पण हीच त्यांची मोठी चूक ठरली. कारण हे तीन प्रवासी रिक्षावाल्याचे साथीदार होते आणि पंडित यांना लुटण्यासाठी त्यांनी हे जाळं विणलं होतं.

दिल्ली गेटच्या ट्रॅफिक सिग्नलजवळ रिक्षावाल्यानं रिक्षा थांबवली. चार प्रवासी बसवल्याबद्दल हवालदार दंड करू शकतो, असं सांगत त्यानं दोघांना उतरवलं आणि पुढे जाऊ लागला. तेव्हा, मला संशय आला आणि मी त्याला रिक्षा थांबवायला सांगितली. पण इतक्यात माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीनं चालत्या रिक्षातून उडी मारली. पाठोपाठ रिक्षावाल्यानंही बाहेर उडी घेतली. मग, मागच्या सीटवरूनच मी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला. ट्रफिकमधून वाट काढताना एका पाण्याच्या ट्रॉलीवर आदळून रिक्षा थांबली. त्यानंतर खाली उतरून मी बॅग तपासली तेव्हा त्यातील २ लाख ४० हजार रुपये गायब होते. मी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना कळवली, असा घटनाक्रम अशोक पंडित यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितला.

या प्रकरणी पोलीस तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट नसल्यानं त्यांना अजून काहीच सुगावा लागलेला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज