अ‍ॅपशहर

मुंबईतील झोपडपट्टीत अमली पदार्थांचा फैलाव; शाळेतील मुलेही लक्ष्य

या समस्येकडे पाहताना भाजपचा दृष्टिकोन केवळ राजकीय आहे. नार्कोटिक्स कंट्रोल विभाग केवळ अमली पदार्थ घेणाऱ्यांच्या मागे दिसला, पण अमली पदार्थ विकणारे पकडले जात नाहीत,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 10 Jan 2023, 2:07 pm
मुंबई : ‘मुंबईतील झोपडपट्टी परिसरात अमली पदार्थांचा विळखा वाढत आहे. यामुळे देशाचे भविष्य उद्ध्वस्त होत आहेच, शिवाय अनेक कुटुंबांच्या आशा, आकांक्षा यांनाही धक्का बसत आहे. यामागे फार मोठे रॅकेट आहे. आता शाळेतील मुलेही लक्ष्य होत आहेत. मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थांमध्येही याचा प्रसार होत आहे. झोपडपट्टी परिसरातील अमली पदार्थांचा फैलाव थांबवावा,’ अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम drugs
मुंबईतील झोपडपट्टीत अमली पदार्थांचा फैलाव; शाळेतील मुलेही लक्ष्य


कांदिवली परिसरातील वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन सचिन सावंत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह उत्तर मुंबई विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. या शिष्टमंडळात माजी नगरसेवक राणा सिंह, मुंबई काँग्रेसचे सचिव आनंद राय, आर. पी. पांडे, रत्नाकर सिंह, सुनील तिवारी, राकेश झा व काही नागरी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी नागरी संस्थांनी घेतलेले सह्यांचे अभियान व जनमानसाचा प्रतिसाद अतिरिक्त पोलिस आयुक्तांसमोर दर्शविण्यात आला. हा प्रकार अतिशय गंभीर असून पोलिस यावर कडक कारवाई करतील आणि मूळापासून अमली पदार्थांचे रॅकेट खणून काढू, असे आश्वासन अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी दिले.

‘गुजरातमधील बंदरांमध्ये हजारो किलो अमली पदार्थ येत आहेत, पण त्याच्या मूळाशी तपास यंत्रणा पोहोचत नाहीत. या अमली पदार्थांचा मुंबईतील समस्येशी संबंध आहे का, याच्या चौकशीची गरज आहे,’ असे सावंत म्हणाले. ‘या समस्येकडे पाहताना भाजपचा दृष्टिकोन केवळ राजकीय आहे. नार्कोटिक्स कंट्रोल विभाग केवळ अमली पदार्थ घेणाऱ्यांच्या मागे दिसला, पण अमली पदार्थ विकणारे पकडले जात नाहीत,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रत्येक झोपडपट्टीमध्ये नशामुक्ती केंद्र असावे, अशी मागणी लवकरच मुंबई महापालिकेकडे करू, असे ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज