अ‍ॅपशहर

शौचालयांच्या कामात कंत्राटदारांचा खोडा

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मुंबई हागणदारीमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले असले तरी या कामात कंत्राटदारांनी खोडा घातला आहे. मुंबईच्या विविध भागात सार्वजनिक शौचालये बांधण्यासाठी पालिकेने निविदा काढल्या

Maharashtra Times 13 Oct 2018, 4:00 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम SWACH


केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मुंबई हागणदारीमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले असले तरी या कामात कंत्राटदारांनी खोडा घातला आहे. मुंबईच्या विविध भागात सार्वजनिक शौचालये बांधण्यासाठी पालिकेने निविदा काढल्या. मात्र कंत्राटदारांनी शौचालय बांधणीचा दर चढा ठेवल्याने पालिकेने अंदाजित केलेल्या खर्चात कंत्राटदार मिळणे मुश्कील झाले आहे. परिणामी मुंबईच्या विविध भागांत २३ निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या निविदा भरण्यासाठी आता १७ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, शौचालय बांधणीचा मुद्दा शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला आला तेव्हा सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या या कारभारावर कडाडून हल्ला चढवला.

(निविदांना प्रतिसाद नाही...१५)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज