अ‍ॅपशहर

Eknath Shinde Net Worth: एकनाथ शिंदेंकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती; वाचा महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांवर...

Facts About Eknath Sambhaji Shinde: सामान्य शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास आहे. जाणून घेऊयात राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्ती आणि अन्य गोष्टींबद्दल...

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2022, 7:03 pm
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात भाजपची सत्ता आणि मुख्यमंत्री होईल असे वाटत असताना प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. एक रिक्षा चालक, कट्टर शिवसैनिक, नगरसेवक, आमदार आणि मंत्रीनंतर आता शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde CM
एकनाथ शिंदे


शिंदे यांचा जन्म १९६४ साली सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील होय. त्यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले असून एक रिक्षाचालक म्हणून त्यांनी सुरुवात केली. रिक्षाचालक असतानाच ८०च्या शतकात ते शिवसेनेत दाखल झाले आणि तेथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. १९९७ साली ते ठाणे मनपात नगरसेवक म्हणून निवडून गेले. २००१ मध्ये ते विरोधी पक्षनेते होते. २००२ मधील दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्यानंतर ३ वर्ष त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते होते.

वाचा- सर्वात शक्तिशाली शिवसैनिक झाला थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..

इतक्या कोटींची संपत्ती

एका रिक्षाचालकापासून सुरू झालेला एकनाथ शिंदे यांचा प्रवास आता मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रत्रिज्ञापत्रात शिंदे यांच्याकडे ११ कोटी ५६ लाखाहून अधिक संपत्ती आहे (Eknath Shinde Net Worth). यातील ९.४५ कोटी ही स्थिर तर २.१० कोटी इतकी अस्थिर संपत्ती आहे. सामान्य शिवसैनिक म्हणून शिंदे यांचा प्रवास सुरू झाल्याने पक्षासाठी त्यांनी अनेक आंदोलन केली आहेत. सेनेसाठी ते तुरुंगात देखील गेलेत. त्यांच्यावर १८ गुन्हा दाखल आहेत.

वाचा- एकनाथ शिंदेंकडे नेमके किती संख्याबळ? पत्रकार परिषदेत उत्तर मिळाले आणि एकच हशा पिकला

प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी त्यांचा व्यवसाय बांधकाम व्यवसाय असे म्हटले आहे. शिंदे यांच्याकडे सात गाड्या असून त्याची एकूण किंमत ४६ लाख इतकी आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज