अ‍ॅपशहर

मोठी बातमी : शिवसेना कोणाची हे कसं ठरणार? निवडणूक आयुक्तांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

Shivsena News : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी दाव्यांबाबत निवडणूक आयोगाकडून काय निर्णय देण्यात येतो, याबाबत राज्यासह देशभरात उत्सुकता आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Sep 2022, 9:31 pm
मुंबई : सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सुरू असलेल्या वादावरून निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. तसंच निवडणूक आयोगही चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी दाव्यांबाबत निवडणूक आयोगाकडून काय निर्णय देण्यात येतो, याबाबत राज्यासह देशभरात उत्सुकता निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajeev kumar
राजीव कुमार


'एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देणे किंवा निवडणूक चिन्ह देण्याच्या अर्जावर निर्णय देताना पूर्णपणे पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जाईल,' असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. तसंच निवडणूक आयोगाकडे बहुमताच्या नियमाची पारदर्शक प्रक्रिया आहे आणि या प्रकरणातही आयोगाकडून ती प्रक्रिया केली जाईल, असंही ते म्हणाले.

सोनिया गांधींकडे खर्गे-माकन यांचा राजस्थानचा रिपोर्ट सादर, अशोक गहलोतांबाबत मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत बोलताना निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, 'राजकीय पक्षाबाबत आणि त्याच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला आधीपासूनच आहे. शिवसेनेच्या प्रकरणातही संघटनेतील बहुमताची चाचपणी करून आम्ही निर्णय घेऊ.' गुजरातमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राजीव कुमार हे गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी कुमार यांनी शिवसेना आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ही प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्टाचा ठाकरेंना धक्का, धनुष्यबाण ठाकरेंना की शिंदेंना?, रिक्षा-टॅक्सीची दरवाढ...वाचा, मटा ऑनलाइनच्या टॉप टेन न्यूज

दरम्यान, मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुका तोंडावर असताना केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय काय येतो आणि शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत काय आदेश होतो, त्याबद्दल आता राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख