अ‍ॅपशहर

इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; सात वर्षीय मुलाचा मृत्यू

Electric Scooter Battery Blast: वसईतील एका घरात चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट त्या घरातील सात वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतला. २३ सप्टेंबर रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेत भाजलेल्या मुलाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Authored byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2022, 6:19 am
म. टा. वृत्तसेवा, वसईः वसईतील एका घरात चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट त्या घरातील सात वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतला. २३ सप्टेंबर रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेत भाजलेल्या मुलाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम deadbody


शब्बीर शाहनवाज अन्सारी असे मृत मुलाचे नाव आहे. वसई पूर्वेकडील रामदास नगर येथे राहणाऱ्या शाहनवाज अन्सारी यांनी २३ सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी ठेवली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास या बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात हॉलमध्ये झोपलेला शब्बीर आणि त्याची आई रुक्साना हे दोघे भाजले. शब्बीर ७० ते ८० टक्के भाजल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
लेखकाबद्दल
मानसी क्षीरसागर
मानसी क्षीरसागर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजीटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | डिजीटल पत्रकारितेचा सहा वर्षांचा अनुभव आहे | सामाजिक, राजकीय, मनोरंजन याबरोबरच माहितीविषयक आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे कव्हरेज करण्याची विशेष आवड... आणखी वाचा

महत्वाचे लेख