अ‍ॅपशहर

ईडी प्रकरणावर आदित्य ठाकरेंची छोटीशी, पण नेमकी प्रतिक्रिया

शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने बजावलेल्या नोटिशीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. (Aaditya Thackeray on ED Notice to Sanjay Raut's wife)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Dec 2020, 8:06 am
मुंबई: पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर राजकीय टीका-टिप्पणीला वेग आला आहे. या नोटिशीवरून सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्ष भाजपचे नेते आमनेसामने आले आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. (Aaditya Thackeray on ED Notice to Sanjay Raut's wife)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sanjay Raut-Aditya Thackeray


वाचा: 'शरद पवारांना बजावलेली नोटीस ईडीने मागे का घेतली?'

एका कार्यक्रमाच्या प्रसंगी 'एएनआय'शी बोलताना आदित्य यांनी ईडी प्रकरणावर भाष्य केले. 'राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, महाविकास आघाडी अशा कुठल्याही दबावाला घाबरत नाही. ही आघाडी भक्कम आहे. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काम करते आहे,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.

ईडी प्रकरणावर कोण काय म्हणाले?


'ईडीची नोटीस आल्याबाबत मी काहीही बोललेलो नाही. भाजपचे लोकच माहिती देताहेत. कालपासून वाट पाहतोय पण अजूनही कोणीही आलेलं नाही. याविषयी भाजपच्या लोकांकडे जास्त माहिती आहे. त्यामुळं मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवलाय. कदाचित ईडीची नोटीस तिथं अडकली असेल - संजय राऊत, शिवसेना खासदार

'ईडीच्या नोटिशीमध्ये आता काही नवीन राहिलेलं नाही. एखाद्या प्रकरणाशी संबंध असो किंवा नसो, भारतात अनेक लोकांना नोटिसा बजावल्या जातात. हे सगळं इतकं स्वस्त झालेलं आहे की लोकांनाही आता त्याचं काही खरं वाटत नाही. त्यामुळं याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही
प्रफुल्ल पटेल, (नेते, राष्ट्रवादी काँग्रेस)

'तुमच्या कारवाईला घाबरतं कोण? महाराष्ट्रातील कोणीही नेता ईडीच्या नोटिशीला घाबरत नाही. शरद पवारांनाही अशीच नोटीस पाठवण्यात आली होती. तिचं काय झालं? ती नोटीस मागे का घेतली गेली? - नवाब मलिक (अल्पसंख्याक मंत्री व प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस)

वाचा: ईडी प्रकरणावर बोलताना संजय राऊत असं का म्हणाले?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज