अ‍ॅपशहर

एकनाथ शिंदेंकडे नेमके किती संख्याबळ? पत्रकार परिषदेत उत्तर मिळाले आणि एकच हशा पिकला

How many MLAs are There with Eknath Shinde: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोबत किती आमदार आहेत हे देखील सांगितले.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2022, 6:15 pm
मुंबई: राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार आणि मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती होणार हे निश्चित असताना काही मिनिटांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्वत: फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली. राज्यातील नव्या सरकारमध्ये स्वत: फडणवीस असणार नाहीत. भाजप शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde
एकनाथ शिंदे


एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून त्यांच्या सोबत शिवसेनेचे किती आमदार आहेत याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. सुरुवातीला १५ असलेली संख्या हळूहळू वाढू लागली आणि ती ३९ पर्यंत पोहोचल्याचे बोलले जाऊ लागले. शिवसेनेतील बंडखोर आणि काही अपक्ष आमदार शिंदेंसोबत होते. पण त्यांची नेमकी संख्या किती हे कोणालाच माहिती नव्हते. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी याचा खुलासा केला.

वाचा- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, भाजपचा पाठिंबा; शिंदे-फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. विधानसभेतील संख्याबळ पाहता फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण त्यांनी बाळासाहेबांच्या एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. आता आमच्याकडे भाजपचे १३० सदस्य आणि आमचे ५० आणि सोबत किती येतील माहिती नाही, अशा शब्दात विधिमंडळातील स्वत:ची ताकद सांगितली.

वाचा- 'फडणवीसांसारखा मोठ्या मनाचा माणूस नाही', मुख्यमंत्री पदाच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच बोलले

काय म्हणाले एकनाथ शिंदे
-नाईलाजामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला
-महाविकास आघाडीमुळे अनेक निर्णय घेता येत नव्हते
-राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो
-महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल
-देवेंद्र फडणवीसांएवढ्या मोठ्या मनाचा माणूस पाहिला नाही
-फडणवीसांच्या मोठ्या मनाने एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवले
-फडणवीसांसारखी माणसं राजकारणात दुर्मिळ
-फडणवीसांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
-नरेंद्र मोदी अमित शाहांनी संधी दिल्याबाबत धन्यवाद
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख