अ‍ॅपशहर

परीक्षा विभागानेच केली कॉपी!

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या घोळाचा परिपाठ कायम असून गुरुवारी इंजिनीअरिंग परीक्षेदरम्यान परीक्षा विभागाने मे महिन्यात झालेल्या परीक्षेसाठी पाठविलेली प्रश्नपत्रिका पुन्हा डिसेंबरच्या परीक्षेत पाठविण्याचा प्रताप केला आहे.

Maharashtra Times 15 Dec 2017, 2:37 am
sourabh.sharma1@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम exam paper mess in mumbai university
परीक्षा विभागानेच केली कॉपी!

Tweet : @sourabhsMT

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या घोळाचा परिपाठ कायम असून गुरुवारी इंजिनीअरिंग परीक्षेदरम्यान परीक्षा विभागाने मे महिन्यात झालेल्या परीक्षेसाठी पाठविलेली प्रश्नपत्रिका पुन्हा डिसेंबरच्या परीक्षेत पाठविण्याचा प्रताप केला आहे. इंजिनीअरिंगच्या सेमिस्टर पाचच्या बिल्डिंग डिझाइन ड्रॉइंग या विषयाच्या परीक्षेत हा घोळ झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. मात्र याबाबत मुंबई विद्यापीठाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सध्या विद्यापीठ संलग्नित कॉलेजांमध्ये इंजिनीअरिंगची परीक्षा सुरू आहे. त्यानुसार गुरुवारी बिल्डिंग ड्रॉइंग डिझाइन (२) हा पेपर होता. विद्यार्थ्यांना आलेला हा पेपर तंतोतंत मे २०१७मध्ये झालेल्या परीक्षेदरम्यान आलेल्या प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे दिसून आले. या प्रकाराचा आम्हाला फटका बसू नये, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. या प्रश्नपत्रिकेच्या क्यू पी कोडमध्येही एकाच अंकाचा फरक असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज