अ‍ॅपशहर

श्रीदेवी यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट गुप्त ठेवला

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने कपूर कुटुंबासह बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. पण त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून उघड झालेलं नाही. दुबईत श्रीदेवी यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Feb 2018, 12:45 pm
मुंबईः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sridevi-home


अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने कपूर कुटुंबासह बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. पण त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून उघड झालेलं नाही. दुबईत श्रीदेवी यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाला आहे. मात्र अद्याप हा रिपोर्ट सार्वजनिक केलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

श्रीदेवी यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र आणि हस्तांतराची प्रक्रिया सुरू आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांचे पार्थिव दुबईहून रवाना करण्यात येईल. ते संध्याकाळी पाच-सहा वाजेपर्यंत मुंबईत दाखल होईल, असं सांगण्यात येतंय. दुसरीकडे मुंबईतील वर्सोवा येथील 'भाग्य' बंगल्यात श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेची तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या बंगल्यावर बॉलिवूड कलाकारांनी गर्दी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज