अ‍ॅपशहर

Anand Mahindra करोना लढा: आनंद महिंद्रा यांनी केलं मुंबई महापालिकेचं कौतुक

कोविड १९ ची साथ नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिकेनं गेले चार महिने केलेल्या प्रयत्नांचं महिंद्रा उद्योग समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी कौतुक केलं आहे. (Anand Mahindra praises BMC)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2020, 12:04 am
मुंबई: करोना साथीच्या विरोधात निकराची झुंज देऊन या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवणाऱ्या मुंबई महापालिकेचं महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी जाहीर कौतुक केलं आहे. करोनाच्या प्रत्येक दिवसाच्या परिस्थितीची इत्यंभूत माहिती देणारा मुंबई महापालिकेचा 'डॅशबोर्ड' हा इतर शहरांसाठी आदर्श नमुना आहे, असं महिंद्रा यांनी म्हटलं आहे. (Anand Mahindra praises BMC for fight against Corona)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आनंद महिंद्रांकडून बीएमसीचं कौतुक


वाचा: उद्धव ठाकरेंच्या 'या' उत्तरावर ठरणार महाविकास आघाडीचं भवितव्य?

महिंद्रा यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्वीटसोबत त्यांनी महापालिकेचा डॅशबोर्डही शेअर केला आहे. ट्वीटमध्ये ते म्हणतात, 'कोविड १९ च्या साथीची सुरुवात झाली, तेव्हा पहिल्या टप्प्यात मुंबई महापालिका चांगलीच सक्रिय होती. हा आजार व्यवस्थित हाताळला गेला. मधल्या काळात रुग्णांची संख्या वाढल्यानं परिस्थिती काहीशी चिंताजनक झाली होती. महापालिकेची यंत्रणाही काहीशी आत्मसंतुष्ट दिसत होती. मात्र, नंतर वेगानं परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं,' असं महिंद्रा यांनी म्हटलं आहे.

कोविडग्रस्त रुग्णांना खाटा उपलब्ध करून देणे, त्यांच्यावर उपचार करणे आणि संसर्ग कमीत कमी होईल याची काळजी घेण्यावर महापालिकेचा भर आहे. येत्या काळात समूह संसर्गाचा धोका असल्यानं याशिवाय दुसरा पर्याय देखील नाही. मुंबईत अजूनही आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेड्सची गरज आहे. मात्र, पहिल्या पेक्षा परिस्थिती नक्कीच चांगली आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.

वाचा: 'मी इथेच बसलो आहे; मुलाखत सुरू असताना सरकार पाडा'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज