अ‍ॅपशहर

मुंबई: सिनेविस्टा स्टुडिओला मोठी आग; कलाकार बचावले

कांजूरमार्गमधील गांधी नगर परिसरातील सिनेविस्टा स्टुडिओला लागलेल्या आगीत हा स्टुडिओ जळून खाक झाला आहे. आगीचे वृत्त कळताच अग्मिशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jan 2018, 12:08 am
मुंबई: कांजूरमार्गमधील गांधी नगर परिसरातील सिनेविस्टा स्टुडिओला आग लागली असून या आगीत हा स्टुडिओचे मोठे नुकसान झाले आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असलेले कलाकार आणि इतर कर्मचारी मंडळींना वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आगीचे वृत्त कळताच अग्मिशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fire broke out in cinevista studeo of kanjurmarg in mumbai
मुंबई: सिनेविस्टा स्टुडिओला मोठी आग; कलाकार बचावले


या स्टुडिओला आग लागली त्यावेळी 'बेपनाह' या कलर्स वाहिनीवरील कार्यक्रमाचे, तसेच हासिल या सोनी टीव्हीवरील कार्यक्रमाचे शूटिंग सुरू होते. आग लागताच प्रसंगावधान राखून स्टुडिओत उपस्थित असलेल्या सर्वांना तातडीने बाहेर काढण्यात आले. स्टुडिओत सुमारे १५० तंत्रज्ञ आणि कलाकार उपस्थित होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत काही समजू शकलेले नाही.

व्हिडिओ : मुंबई- कांजुरमार्ग येथील सिनेविस्टा स्टुडिओला लागलेलीआग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू. pic.twitter.com/8XC504a6to — maharashtratimes.com (@mataonline) January 6, 2018 कांजूरमार्गमध्ये पवई टेलिफोनसमोर सिनेविस्टा हा स्टुडिओ आहे. या स्टुडिओत प्रामुख्याने हिंदी टीव्ही मालिकांचे शूटिंग होते. या बरोबर या स्टुडिओत सेटही उभारण्यात आला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज