भायखळा अग्निशमन केंद्रातर्फे भाटिया हॉस्पिटल येथे शुक्रवारी आगीपासून बचावाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन बचावकार्याचे प्रशिक्षण देण्यात आले. इमारतीच्या उंच मजल्यावर आग लागल्यास तेथे अडकलेल्यांना कशी मदत करावी यासंदर्भात माहिती देण्यात आली. आपत्कालीन स्थितीत रुग्णांची सुरक्षितपणे सुटका करण्याचे तंत्रही यावेळी सांगण्यात आले.
फायर ड्रिल फोटो ओळी
भायखळा अग्निशमन केंद्रातर्फे भाटिया हॉस्पिटल येथे शुक्रवारी आगीपासून बचावाची रंगीत तालीम घेण्यात आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Aug 2019, 4:00 am