अ‍ॅपशहर

अग्निसुरक्षेकडे गिरगावातही दुर्लक्ष

मुंबईतील गजबजलेले एक ठिकाण म्हणजे गिरगाव. गिरगाव आणि त्या संपूर्ण पट्ट्यात चाळी, इमारतींपासून अनेक छोटे-मोठे उद्योग असून तिथेही अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविले आहेत. गिरगावात काही ठिकाणी फरसाण, वेफर उत्पादनाचेही काम मोठ्या प्रमाणात चालते. त्याशिवाय, रेस्तराँप्रमाणे पाणीपुरी बनविणारेही असून या सर्वांसाठी अवैध मार्गाने सिलिंडरचा पुरवठा केला जातो. अनेक वर्षांपासून धोकादायक पद्धतीने उत्पादन करणाऱ्या या उद्योगांवर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी आग, स्फोटासारखी दुर्घटना झाल्यास अनर्थ होण्याची भीती वारंवार वर्तवली जाते.

Maharashtra Times 30 Dec 2017, 4:37 am
सिलिंडरचे गौडबंगाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fire safety is neglected in girgaon
अग्निसुरक्षेकडे गिरगावातही दुर्लक्ष

म. टा खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील गजबजलेले एक ठिकाण म्हणजे गिरगाव. गिरगाव आणि त्या संपूर्ण पट्ट्यात चाळी, इमारतींपासून अनेक छोटे-मोठे उद्योग असून तिथेही अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविले आहेत. गिरगावात काही ठिकाणी फरसाण, वेफर उत्पादनाचेही काम मोठ्या प्रमाणात चालते. त्याशिवाय, रेस्तराँप्रमाणे पाणीपुरी बनविणारेही असून या सर्वांसाठी अवैध मार्गाने सिलिंडरचा पुरवठा केला जातो. अनेक वर्षांपासून धोकादायक पद्धतीने उत्पादन करणाऱ्या या उद्योगांवर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी आग, स्फोटासारखी दुर्घटना झाल्यास अनर्थ होण्याची भीती वारंवार वर्तवली जाते.

गिरगावमधील ठाकूरद्वार ते सेंट्रल सिनेमा या मुख्य भागात १५हून अधिक फरसाण, वेफर उत्पादक आहेत. केवळ अर्धा किमी.च्या या वर्दळीच्या परिसरात या उत्पादकांकडून कोणतेही सुरक्षाउपाय योजण्यात आलेले नाहीत. या उत्पादनासाठी होणारा सिलिंडरचा वापर हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. यासाठी काळ्या बाजारातून आणलेल्या सिलिंडरचा वापर केला जातो, मात्र त्याकडे कोणतीही यंत्रणा लक्ष देण्यास तयार नाही, असा आरोप स्थानिक करतात.

सिलिंडर तळमजल्याच्या मागील बाजूस ठेवले जात असल्याने तो धोका कधीच समोर येत नाही. मागील बाजूस फरसाण, वेफर तयार करण्यासाठी घाणा सुरू राहतो. परंतु त्यात किती धोका आहे, याकडे दुर्लक्ष होते. येथील गटारांना झाकणे असली तरीही त्यातून येणारा वायू आणि सिलिंडरमधील गॅस यांचा संयोग झाल्यास एखादी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिक व्यक्त करतात. १५ वर्षांपासून अशाप्रकारे उत्पादन होत असूनही त्याकडे काणाडोळा केला जात आहे. साकीनाक्याच्या दुर्घटनेनंतर तरी पालिका वा पोलिस यंत्रणा त्याची दखल घेतील, असे स्थानिकांना वाटत होते. मात्र अद्याप तरी कोणतीही कारवाई झालेली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज