अ‍ॅपशहर

काँग्रेसची पहिली यादी शनिवारी?

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री व मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस हायकमांडने निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले भूपिंदरसिंग हुड्डा यांनी बुधवारी मुंबई काँग्रेसच्या कोअर समिती आणि प्रमुख नगरसेवकांशी चर्चा करून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. २६ जानेवारी संध्याकाळपर्यंत सर्व जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून काँग्रेस उमेदवारांची यादी निश्चित करा व २८ तारखेपर्यंत पहिली यादी जाहीर करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

Maharashtra Times 26 Jan 2017, 4:00 am
मुंबईसह इतर शहरांसाठी सर्व जिल्हा‌ध्यक्षांना आदेश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम first list of congress bmc poll
काँग्रेसची पहिली यादी शनिवारी?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री व मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस हायकमांडने निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले भूपिंदरसिंग हुड्डा यांनी बुधवारी मुंबई काँग्रेसच्या कोअर समिती आणि प्रमुख नगरसेवकांशी चर्चा करून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. २६ जानेवारी संध्याकाळपर्यंत सर्व जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून काँग्रेस उमेदवारांची यादी निश्चित करा व २८ तारखेपर्यंत पहिली यादी जाहीर करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

मुंबई काँग्रेसमध्ये सध्या गुरुदास कामत यांनी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली असल्याने हुड्डा यांच्यावर काँग्रेसमधील सुंदोपसुंदी संपविण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

हुड्डा यांनी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांचीही मते जाणून घेतली. राहुल गांधी यांच्या सूचनेनुसारच उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत जिल्हाध्यक्षांना महत्त्व देण्यात आले असून ते योग्यच आहे, असे बहुतेक जिल्हा‌ध्यक्षांनी सांगितल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पार्टी यांच्याशी काँग्रेसची आघाडी करण्याबाबतही हुड्डा यांनी मत जाणून घेतले. यात बहुतांश जणांनी ‘आघाडी करू नये’ हे मत व्यक्त केल्याचे समजते. एकतर आता खूप उशीर झाला असून हायकमांडची इच्छाच असेल तर या दोन पक्षांच्या गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा व ज्या जागा फार कमी फरकाने हरल्या असतील, अशा जागांवर विचार करावा, असे सांगितल्याचे समजते.

हुड्डा हे २७ जानेवारी रोजी राहुल गांधी यांची भेट घेणार असून त्यांना अहवाल सुपूर्द करणार आहेत. पक्षात प्रसार माध्यमांकडे जाहीर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून त्याची दखल घेण्यात येईल, असे आश्वासन हुड्डा यांनी दिल्याचे समजते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज