अ‍ॅपशहर

वैद्यकीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

राज्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रम (मेडिकल) प्रवेशाची सुधारित पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत ४९ हजार ८५६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या अधिवास प्रमाणपत्रांसंदर्भात (डोमिसाईल) काही समस्या निर्माण झाल्या होत्या. या सर्व कागदपत्रांची तपासणी करून त्यांत सुधारणा करण्यात आली आहे. त्यांनंतर ही सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Times 25 Jul 2017, 9:11 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम first merit list for state medical admission released
वैद्यकीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

राज्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रम (मेडिकल) प्रवेशाची सुधारित पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत ४९ हजार ८५६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या अधिवास प्रमाणपत्रांसंदर्भात (डोमिसाईल) काही समस्या निर्माण झाल्या होत्या. या सर्व कागदपत्रांची तपासणी करून त्यांत सुधारणा करण्यात आली आहे. त्यांनंतर ही सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पहिल्या सर्वसाधारण यादीमधून एकूण ७६७ विद्यार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहेत. मागच्या यादीमध्ये ५० हजार ६२३ विद्यार्थ्यांचा समावेश होता. पहिल्या यादीत समावेश असलेले ४९ हजार ८५६ विद्यार्थी पुढील निवड यादीसाठी पात्र असणार आहेत.

या निवड यादीमधील विद्यार्थ्यांना आपापले कॉलेज कोणते असणार आहे याबाबत येत्या दोन दिवसांमध्ये माहिती दिली जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज