अ‍ॅपशहर

झोपडपट्टीत विजेची तार पडून पाच भाजले!

वडाळ्यातील गणेश नगर झोपडपट्टीत उच्च दाबाची विजेची तार अंगावर पडल्याने पाचजण भाजले आहेत. त्यात दहा वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. जखमींना उपचारांसाठी केईम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Maharashtra Times 24 Apr 2017, 10:17 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम five people suffered burn injuries after a high tension wire fell in slum of wadala
झोपडपट्टीत विजेची तार पडून पाच भाजले!


वडाळ्यातील गणेश नगर झोपडपट्टीत उच्च दाबाची विजेची तार अंगावर पडल्याने पाचजण भाजले आहेत. त्यात दहा वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. जखमींना उपचारांसाठी केईम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गणेश नगर झोपडपट्टीतील आडवा बांध चाळीतील रूम नं. १९१, सॉल्टपेन रोड येथील घरावरून गेलेल्या उच्च दाबाच्या तारेला एका इसमाचा धक्का लागला. या धक्क्यामुळं स्पार्किंग होऊन वायर झोपडपट्टीवर पडली. त्यात इजाज अनीश अहमद अन्सारी (वय १९), सुनील शंकर थळे (वय ४२), शर्मिला सुनिल थळे (वय ३२), श्रावणी सुनिल थळे (वय १०) व प्रवीण बाळोजी वेटकुली (वय ३०) हे पाचजण जखमी झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज