अ‍ॅपशहर

फॉर्मेली‌न डॉक्टरांच्या जीवावर

ऑपरेशन थिएटरच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे फॉर्मेलीन हे रसायन रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. अलीकडेच पाणी समजून हे रसायन प्यायलेल्या जे. जे. रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टरची प्रकृती चिंताजनक आहे, तर याच रुग्णालयातील सर्जरी व न्युरोसर्जरी विभागांतील डॉक्टरही चुकीने हे रसायन प्यायले होते.

राजेश चुरी | Maharashtra Times 20 Jan 2017, 4:56 am
पाण्यासारखे दिसत असल्याने गल्लत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम formelin kills doctors
फॉर्मेली‌न डॉक्टरांच्या जीवावर


rajesh.chury@timesgroup.com

Tweet : @rajeshchuryMT

मुंबई : ऑपरेशन थिएटरच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे फॉर्मेलीन हे रसायन रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. अलीकडेच पाणी समजून हे रसायन प्यायलेल्या जे. जे. रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टरची प्रकृती चिंताजनक आहे, तर याच रुग्णालयातील सर्जरी व न्युरोसर्जरी विभागांतील डॉक्टरही चुकीने हे रसायन प्यायले होते.

जे. जे.च्या ऑर्थोपेडिक विभागाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये हे रसायन बाहेर ठेवले होते. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास डॉ. उज्ज्वल रामटेके पाणी समजून हे घातक रसायन प्यायले. त्यानंतर तत्काळ त्यांना त्रास सुरू झाला. जे.जे.मध्येच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रसायनामुळे त्यांच्या किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे ऑर्थोपेडिक विभागातील या घटनेनंतर एका कर्मचाऱ्याने तहान लागली म्हणून नेमकी तीच बाटली पाणी ‌समजून पिण्यासाठी उचलली. मात्र शेजारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्याने ती बाटली खाली ठेवली. अखेर ती बाटली पंचनाम्यासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.

दोन डॉक्टर फसले

अशीच घटना काही दिवसांपूर्वी जे.जे.च्याच सर्जरी व न्युरोसर्जरी विभागाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये घडली होती. या विभागांतील डॉक्टर शस्त्रक्रिया करून बाहेर आले आणि समोरच टेबलावर फॉर्मेलिनची बाटली होती. पाणी समजून या डॉक्टरांनी या रसायनाची बाटली तोंडला लावली.त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार झाले. सुदैवाने या दोन डॉक्टरांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला नाही.

गल्लत का होते

ऑपरेशन थिएटरमध्ये सलग सहा ते नऊ सात शस्त्रक्रिया करून डॉक्टर थकतात. मानसिक व शारीरिक थकवा घालवण्यासाठी समोर दिसेल ती पाण्याची बाटली तोंडाला लावतात. पूर्वीची गडद रंगाची बाटली बदलून पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसारख्या पॅकिंगमधून आता हे रसायन पाठवण्यात येत असल्याने लक्षात येत नाही, असे एका सर्जनने सांगितले.

अशा घटना टाळण्यासाठी त्या बाटलींवर फॉर्मोलीन असे ठळक लाल रंगात लिहावे, अशी सूचना आम्ही सरकारमार्फत पुरवठादाराला केली आहे.

डॉ. तात्याराव लहाने, डीन-जे. जे. रुग्णालय

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज