अ‍ॅपशहर

माजी मंत्री ए टी पवार यांचं निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री अर्जुन तुकाराम (ए टी) पवार यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ए टी पवार यांची प्रकृती खालावली होती.

Maharashtra Times 10 May 2017, 10:36 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम former minister a t pawar dies in mumbai
माजी मंत्री ए टी पवार यांचं निधन


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री अर्जुन तुकाराम (ए टी) पवार यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते.

गेल्या काही काळापासून ए टी पवार यांची प्रकृती खालावली होती. आठ दिवसांपासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्या दरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कळवण मतदारसंघातून ८ वेळा विधानसभेवर निवडून गेलेले ए टी पवार यांनी आदिवासी भागात अनेक लोकोपयोगी कामं केली होती. आदिवासी विकास खात्याचं मंत्रिपद सांभाळताना अनेक योजना मार्गी लावल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जात. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळात दुःख व्यक्त होतंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज