अ‍ॅपशहर

Nilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच केला होता'

देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी पवार साहेबांचा खरा गेम अजितदादा पवारांनीच केला होता, असा टोला माजी खासदार नीलेश राणे यांनी हाणला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2020, 9:23 am
मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधीवर टीका करणाऱ्या शिवसेनेला माजी खासदार नीलेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. 'शिवसेना नेहमी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या पहाटेच्या शपथविधीवर टीका करते. पण पवारसाहेबांचा गेम कोणी केला असेल तर तो अजितदादा पवारांनीच केला,' असा टोला नीलेश राणे यांनी हाणला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अजित पवार-शरद पवार


वाचा: शिवसेनेचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत सावळा गोंधळ; भाजपनं दाखलेच दिले

शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या सरकारबाबत गौप्यस्फोट करण्यात आला आहे. फडणवीसांचं हे सरकार वाचवण्यासाठी राज्यातील काही अधिकारी राबले होते. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळ्या पद्धतीनं जाळ्यात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते. गुप्तचर खात्यानंही याकामी विशेष कामगिरी बजावली. बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते,' असा आरोप शिवसेनेनं केला आहे. फडणवीसांना 'पहाटेचे मुख्यमंत्री' असं म्हणूनही हिणवलं आहे.

वाचा: पोलिसांना गुंगारा देत मनसेच्या नेत्यांनी केला लोकल प्रवास

शिवसेनेच्या या टीकेला उत्तर देताना नीलेश राणे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. फडणवीसांच्या शपथेवर टीका करता? मग अजितदादा पवार पहाटे-पहाटे राज्यपालांच्या बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय,' असा प्रश्न राणेंनी केला आहे. 'अजित पवारांजवळ आमदार टिकले नाहीत म्हणून ते परत गेले. पण पवार साहेबांचा खरा राजकीय गेम तेव्हा कोणी केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला,' असं म्हणत नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही डिवचलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज