अ‍ॅपशहर

या माणसाचं स्वत:चं असं काहीच नाही; राणेंचा ठाकरेंना टोला

माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 'उद्धव ठाकरे यांना बसल्या जागी सगळं काही मिळालंय. त्यांचं स्वत:चं असं काहीच नाही,' असा टोला नीलेश यांनी हाणला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Apr 2020, 6:29 pm
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर निवडून जाणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांनी त्यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली आहे. 'मुख्यमंत्रिपद काँग्रेस-राष्ट्रवादीमुळं, आमदारकी राज्यपालांकडून आणि पक्ष वडिलांचा... ह्या माणसाचं स्वत:चं असं काहीच नाही,' असा टोला राणे यांनी उद्धव यांना हाणला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rane-Thackeray


करोना Live: राज्य मंत्रिमंडळानं घेतले मोठे निर्णय

राणे कुटुंबीय आणि शिवसेनेचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळं राणे पिता-पुत्र शिवसेनेवर विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. करोनाचं संकट आल्यापासून खासदार नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. गेल्या काही दिवसातील ही टीका 'करोना'च्या अनुषंगानं होती. मात्र, नीलेश राणे यांनी आज केलेलं ट्विट खूपच खोचक आहे. 'उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रासाठी पनवती असून स्वत:साठी मात्र नशीबवान आहेत. त्यांना सगळं बसल्या-बसल्या मिळालंय. आता आमदारकीही बसल्या जागी राज्यपालांनी दिली, असं राणेंनी ट्विटमध्ये म्हटलंय. 'या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा, असाही सल्लाही त्यांनी दिलाय.

मुंबई: दुचाकीस्वारानं पोलिसाला फरपटत नेलं!

इंजिनीअर मारहाण: मनसेच्या रुपाली पाटील म्हणाल्या...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याबाबतचा निर्णय झाला. विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले, पण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात सभागृहाचा सदस्य होणे आवश्यक होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर पडल्यानं त्यांच्या निवडीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर त्यावर आज तोडगा काढण्यात आला. त्यामुळं पुढील घटनात्मक पेच टळला आहे.

भाजपनं गृहमंत्र्यांकडं मागितला राज्यातील 'तबलिगीं'चा हिशेब

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज