म. टा. प्रतिनिधी, मुंबई
दहावीच्या यशस्वी निकालानंतर आता प्रवेशाची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहेत. या मिशन अॅडमिशनसाठी नेमकी तयारी कशी करायची, कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या यासाठी हे मार्गदर्शन.
अकरावी प्रवेशासाठीची माहितीपुस्तिका fyjc.org.in/mumbai या वेबसाइटवर उपलब्ध आहे. विद्यार्थी, पालकांसाठी सूचना
> माहितीपुस्तिका मिळाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी पुस्तिकेसोबत आलेला लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून वेबसाइटवर आपले प्रोफाइल तयार करावे. त्यानंतर शक्यतो आपला पासवर्ड बदलून पुढील प्रक्रियांचा विचार करावा. हा पासवर्ड व्यवस्थित नोंदवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
> दहावीच्या निकालापूर्वीच्या पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना आपली वैयक्तिक माहिती या अर्जामध्ये नोंदवावी लागणार आहे. त्यासाठी अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बोर्डाच्या विद्यार्थ्यांची माहिती घेतलेली आहे. त्यानुसार विद्यार्थ्याने आपले नाव व दहावीच्या परीक्षेचा क्रमांक संकेतस्थळावर नमूद केल्यानंतर त्याची बहुतांश माहिती प्रक्रियेसाठी उपलब्ध होईल. ही माहिती खातरजमा करून विद्यार्थ्यांनी उर्वरित माहिती भरावी.
> प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात कॉलेजचे संकेतांक विचारात घेताना, कॉलेजमधील शाखा, प्रकार, गट, माध्यम, उपलब्ध असणारे वैकल्पिक विषय यांचा योग्य तो विचार करावा. त्यानुसार कॉलेजांचे संकेतांक स्वतंत्रपणे नोंदवून मगच कॉलेजांच्या प्राधान्यक्रमांकांची यादी तयार करावी.
> कॉलेजांची यादी तयार करताना दहावीला मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि निवडत असलेल्या कॉलेजांची गेल्या वर्षीची कट ऑफ यांचा योग्य तो ताळमेळ साधावा. गेल्या वर्षीची कट ऑफ हे केवळ मार्गदर्शक असतील, याचीही नोंद घ्यावी.
> प्रवेशअर्ज सादर केल्यानंतर त्याची एक छापील प्रत विद्यार्थ्याने स्वतःकडे काढून ठेवावी.
कॉलेजक्रम असे निवडा
विद्यार्थ्यांना यंदा कॉलेजांचे पसंतीक्रम नोंदविण्यासाठी एकूण ५० पर्याय देण्यात आले आहेत. त्यापैकी किमान ४० पर्याय भरणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. इंग्रजी माध्यमातून आर्ट्स शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध कॉलेजांची संख्या कमी असल्याने, विद्यार्थ्यांना उपलब्ध असणारे सर्व पर्याय
नोंदविणे बंधनकारक करण्यात
आले आहे. पहिल्या वेळी प्रवेश मिळाल्यावर विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजांमध्ये रिपोर्टिंग करणे बंधनकारकच आहे. अन्यथा
विद्यार्थी प्रक्रियेच्या बाहेर फेकले जातील. एका विद्यार्थ्याला
आपल्या प्रवेश अर्जाद्वारे दोन वेगवेगळ्या शाखांचे पसंतीक्रम भरता येतील. सर्वात पसंतीच्या कॉलेजचा (बेटरमेंटसाठी) विचार होताना, याच पसंतीक्रमानुसार विद्यार्थ्यांना बेटरमेंटची संधी मिळेल.
गरवारेमध्ये पत्रकारिता अभ्यासक्रम
मुंबई विद्यापीठ, गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेचा पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम सी.के.टी महाविद्यालयात सुरू होत आहे. हे वर्ग शनिवार आणि रविवारी भरणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २३ जूनपर्यंत अर्ज भरायचा आहे. अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २६ जूनला होणार आहे. अधिक माहितीसाठी सी. के. टी महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे संपर्क साधावा. संपर्क २७४६४१९३/ २७४५५७६० मोबाइल- ८०८१२२९७०, ९३२४३७२९७० किंवा www.giced.edu या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळू शकेल.
रबर टेक्नॉलॉजीमध्ये करिअर
एमएसबीटीईच्या अंतर्गत रबर टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. यासाठी दहावीनंतर प्रवेश घेता येईल. अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमामध्ये इंजिनीअरींग केमिस्ट्री, रबर फिजिक्स, पेस्टींग ऑफ रबर, वर्कशॉप प्रॅक्टीस, कम्युनिकेशन स्किल्स यांसारख्या विषयांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी www.gpmumbai.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.