अ‍ॅपशहर

'मोरया'च्या जयघोषात बाप्पाचे आगमन

‘गणपती बाप्पा मोरया’चा गगनभेदी जयघोष, वरुणराजाने अधूनमधून दिलेली सलामी, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आज वाजत गाजत बाप्पाचे आगमन झाले. गुरुवारी सायंकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाने मुंबई-ठाण्यातील रस्ते फुलून गेले होते.

Maharashtra Times 25 Aug 2017, 1:29 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganesh chaturthi is being celebrated across the mumbai
'मोरया'च्या जयघोषात बाप्पाचे आगमन


‘गणपती बाप्पा मोरया’चा गगनभेदी जयघोष, वरुणराजाने अधूनमधून दिलेली सलामी, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आज गणरायाचे आगमन झाले. गुरुवारी सायंकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाने मुंबई-ठाण्यातील रस्ते फुलून गेले होते. भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम मायानगरीत दिसून येत होता. लहान-थोरांनी मोठ्या भक्तीभावानं बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली.

बाप्पाच्या आगमनासाठी अवघ्या मुंबापुरीत गेल्या आठ दिवसांपासूनच जय्यत तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची वाट पाहणाऱ्या सर्वच गणेशभक्तांनी अगदी पारंपारिक वेषात बाप्पाचे स्वागत केले. लालबाग-परळमधील मुख्य रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते. त्यामुळे तिथली वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता. सर्वच गणेश मंडळांनी रात्रीपासूनच मिरवणुका काढून वाजतगाजत गणपती आणले. सार्वजनिक मंडळांच्या मंडपांइतकाच उत्साह घराघरांमध्ये पाहायला मिळाला. घराघरांमध्ये प्राणप्रतिष्ठापनेची लगबग सुरू होती. आरती, स्तोत्र आणि मंत्रपठण असं मंगलदायक वातावरण प्रत्येक घरात पाहायला मिळाले. बाप्पा घरी येणार म्हणून बच्चे कंपनी आनंदानं हरखून गेली होती. कुठंबाप्पाची पहिली छबी टिपण्याची तर कुठं बाप्पासोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली होती. बाप्पासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर धडकू लागले आहेत.



स्थापना आणि पूजन

श्रीगणेशाची स्थापना व पूजन करण्यासाठी आज, शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी प्रात:कालपासून दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभवेळ असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तसेच, यावर्षी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मंगळवारी होत असले तरीही ते त्याच दिवशी करावे. गणेशमूर्ती विसर्जनाचा आणि मंगळवारचा काहीही संबंध नाही, असेही सोमण यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज