अ‍ॅपशहर

चेंबूरमध्ये गॅस गळती, तासभर वाहतूक रोखली

चेंबूर नाक्याजवळ आज दुपारी पाईपलाइनमधून अचानक गॅस गळती झाल्याने एकच घबराट पसरली. गॅस गळती सुरू झाल्याबरोबर तात्काळ सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. तब्बल तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर गॅसगळती थांबविण्यात यश आल्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Maharashtra Times 31 Jul 2017, 3:08 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gas leak in chembur under control traffic on sion panvel highway
चेंबूरमध्ये गॅस गळती, तासभर वाहतूक रोखली

चेंबूर नाक्याजवळ आज दुपारी पाईपलाइनमधून अचानक गॅस गळती झाल्याने एकच घबराट पसरली. गॅस गळती सुरू झाल्याबरोबर तात्काळ सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. तब्बल तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर गॅसगळती थांबविण्यात यश आल्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. महानगर गॅस कंपनीच्या एलपीजी गॅस पाईपलाइनमधून अचानक गॅस गळती सुरू झाली. परिसरात गॅसचा वास येऊ लागल्याने येथील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली. त्यानंतर गॅस पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाइनमधील गॅस पुरवठा बंद केला. गॅसगळतीमुळे परिसरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली होती. तसंच वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर गॅसगळतीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. दरम्यान, या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनं करण्यात आलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज