अ‍ॅपशहर

माहीममध्ये मुलीचे अपहरण

परिसरात घबराट म टा...

Dipesh More | MT 2 May 2019, 3:24 pm
परिसरात घबराट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम girl kidnapping in mahim
माहीममध्ये मुलीचे अपहरण


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

माहीम दर्गा येथून सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी पहाटे आणखी एका मुलीचे अपहरण करण्यात आले. माहीम फाटक येथील हॉटेल वेलकमजवळ रस्त्याच्या कडेला कुटुंबियांसह झोपलेली सहा वर्षांची मुलगी बेपत्ता असून याप्रकरणी माहीम पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे माहीम परिसरात घबराट पसरली आहे.

माहीम फाटक येथे बाबूंच्या टोपल्या बनविणारे कुटुंब आपल्या मुलांसह मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे पदपथावर झोपडीत झोपले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास या कुटुंबातील महिला लघुशंकेसाठी झोपडीबाहेर बाहेर गेली. ती परतली, त्यावेळी तिच्या शेजारी झोपलेली तिची सहा वर्षांची मुलगी गायब होती. या महिलेने पतीला उठवून आजुबाजूला शोध घेतला, परंतु मुलगी न सापडल्याने त्या दोघांनी माहीम पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. या घटनेची गंभीर दखल घेत माहीम पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, श्वानपथकांच्या मदतीने शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

वारंवारच्या घटना

माहीम परिसरात बांबूपासून टोपल्या तयार करणारी अनेक कुटुंबे पदपथावरच वास्तव्य करतात. ७ फेब्रुवारी रोजी येथील पाच वर्षांच्या एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली. महिन्याभरापूर्वीही एका चार वर्षांच्या मुलीला एक इसम घेऊन जात असताना तिच्या आईने पाहिले. तिने आरडाओरड करताच स्थानिकांनी मुलीची सुटका करून त्या इसमाला पोलिसांच्या स्वाधीन केले.
लेखकाबद्दल
Dipesh More

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज