म. टा. प्रतिनिधी, मुंबई
कुलाबा ते सिप्झपर्यंत जाणाऱ्या मेट्रो-३ ला छत्रपती शाहू महाराज मुंबई मेट्रो असे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
शिवसेनेने मुंबईतील प्रस्तावित मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात बाधित होणाऱ्या गिरगावातील मराठी माणसांच्या व झाडांच्या कत्तलीच्या मुद्द्यावरून मेट्रोच्या काही कामांना तीव्र विरोध केला होता. आता मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दत्ता नरवणकर यांचे छत्रपती शाहू महाराजांवरील प्रेम उफाळून आले आहे. त्यात शिवसेनेचा मेट्रोविरोध गळून पडल्याचे बोलले जात आहे.