अ‍ॅपशहर

अंधेरीतील गोखले पूल दोन वर्षांसाठी पूर्णपणे बंद; 'हे' आहेत सहा पर्यायी मार्ग

Gokhale Bridge: पूल पाडण्यासंदर्भात नुकतेच वाहतूक पोलिसांबरोबर झालेल्या बैठकीत हा पूल आठवड्याभरात बंद करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून ७ नोव्हेंबरपासून तो बंद करण्यात येणार आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 7 Nov 2022, 1:41 pm
मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल अखेर सोमवार, ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. यामुळे एस. व्ही. रोड व आजूबाजूच्या परिसरात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन, वाहतूक पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाण्यासाठी जोगेश्वरी, अंधेरी, खार, विलेपार्ले येथील सहा पर्यायी मार्ग सुचवले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gokhale bridge3
अंधेरीतील गोखले पूल उद्यापासून बंद; 'पश्चिम द्रुतगती'साठी सहा पर्याय


गोखले पूल सन १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. जुलै २०१८मध्ये तो कोसळला. त्यानंतर २०१९मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात सल्लागाराने गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले. पालिका हद्दीतील पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर रेल्वे हद्दीतील पूल धोकादायक असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे एससीजी कन्सलटन्सी सर्व्हिस कंपनीकडून ऑक्टोबरमध्ये गोखले पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये भेगा पडल्याने पूल धोकादायक बनला असल्याचे सांगत तो पाडण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे हा पूल पाडून तेथे नव्याने पूल उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. पूल पाडण्यासंदर्भात नुकतेच वाहतूक पोलिसांबरोबर झालेल्या बैठकीत हा पूल आठवड्याभरात बंद करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून ७ नोव्हेंबरपासून तो बंद करण्यात येणार आहे.

  • पूल बंद होणार, हे आहेत पर्यायी मार्ग
  • खार सबवे
  • खार
  • मिलन सबवे
  • उड्डाणपूल सांताक्रूझ
  • कॅप्टन गोरे उड्डाणपूल (विलेपार्ले उड्डाणपूल)
  • विलेपार्ले
  • अंधेरी सबवे
  • बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल जोगेश्वरी
  • मृणालताई गोरे उड्डाणपूल गोरेगाव

पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान दोन वर्षे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख