अ‍ॅपशहर

कांदळवनातल्या सोनेरी कोल्ह्यांचा अभ्यास; महामुंबई परिसरातील खारफुटींमध्ये अधिवास आढळल्याने नोंदी घेणार

हा दुर्मिळ प्राणी काय खातो, स्थानिक कुत्रे आणि सोनेरी कोल्ह्यांमध्ये नेमका काय फरक असतो, माणसाशी त्याचे संबंध कसे असतात, या प्रजातीतील प्राण्यांचे एकमेकांशी कसे संबंध असतात याही गोष्टींवर या अभ्यासामुळे प्रकाश पडू शकेल.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 2 Dec 2022, 8:44 am
मुंबई : मुंबईच्या खारफुटी क्षेत्रामध्ये जैवविविधताही नांदते. या खारफुटीमध्ये सोनेरी कोल्ह्याचेही स्थानिकांना दर्शन झालेले आहे. ऐरोलीमध्ये तसेच चारकोप परिसरातही हा सोनेरी कोल्हा पाहिल्याचे स्थानिक सांगतात. मात्र याबद्दल दस्तावेज उपलब्ध नाहीत. यासाठी कांदळवन प्रतिष्ठान आणि वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी, इंडिया यांच्या माध्यमातून सोनेरी कोल्ह्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम golden jackel
कांदळवनातल्या सोनेरी कोल्ह्यांचा अभ्यास; महामुंबई परिसरातील खारफुटींमध्ये अधिवास आढळल्याने नोंदी घेणार


महामुंबई परिसरातील खारफुटींमध्ये डिसेंबर, २०२२ ते जून, २०२३ या कालावधीत हे सर्वेक्षण होणार आहे. महामुंबई परिसरातील सोनेरी कोल्ह्यांबद्दलची माहिती मिळवण्याचा या माध्यमातून प्रयत्न होईल. खारफुटी क्षेत्रामध्ये असलेल्या या प्राण्याबद्दलची अधिक माहिती या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल. कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातूनही यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न होणार आहे. हा दुर्मिळ प्राणी काय खातो, स्थानिक कुत्रे आणि सोनेरी कोल्ह्यांमध्ये नेमका काय फरक असतो, माणसाशी त्याचे संबंध कसे असतात, या प्रजातीतील प्राण्यांचे एकमेकांशी कसे संबंध असतात याही गोष्टींवर या अभ्यासामुळे प्रकाश पडू शकेल.

हे सोनेरी कोल्हे केवळ खारफुटीच्या क्षेत्रात आढळतात. हे कोल्हे सहजासहजी दिसत नाहीत. या कोल्ह्यांच्या संख्येची नोंद उपलब्ध नाही. या अभ्यासाच्या माध्यमातून ही आकडेवारीही समोर येण्याची शक्यता आहे. खारफुटीच्या परिसंस्थेतील अन्नसाखळीचा सोनेरी कोल्हे हा महत्त्वााचा भाग आहेत. राज्याच्या खारफुटी जंगलातील मांसभक्षक प्राण्यांमध्ये यांचा समावेश होतो. या अभ्यासामुळे सोनेरी कोल्ह्यांची परिसंस्था अधिक चांगल्या पद्धतीने समोर येईल असा विश्वास कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी व्यक्त केला. यामुळे इतर प्रजातींच्या संवर्धनाच्या दृष्टीनेही मदत होईल.

बेटांच्या मुंबईत वास्तव्य

सोनेरी कोल्ह्यांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. हे कोल्हे विविध अधिवासामध्ये राहतात. यामध्ये घनदाट जंगलांपासून गवताळ प्रदेश या सगळ्याच समावेश होते. मुंबई जेव्हा सात बेटांमध्ये विभागलेली होती तेव्हाही सोनेरी कोल्हे मुंबईमध्ये होते. सुमारे १०९ वर्षांपूर्वी हे कोल्हे या कोल्ह्यांना चर्नीरोड स्टेशन परिसरातून मरिन ड्राइव्हपर्यंत रानटी कुत्र्यांनी हुसकावून लावल्याची नोंद आढळली आहे.

महत्वाचे लेख