म. टा. प्रतिनिधी, मुंबई
कूपर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तरुणीची डॉक्टरने अश्लील क्लिप काढून व्हॅाट्सअॅपवर वायरल केल्याची घटना ताजी असतानाच, गोवंडीमधील एका नामांकित वैद्यकीय चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी एका ६४ वर्षीय एमबीबीएस डॅाक्टरला चेंबूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डॉ. सुभाष सेहगल असे डॉक्टरचे नाव आहे.
चेंबूरच्या प्रबुद्ध नगर परिसरात राहणारी तरुणी मासिक पाळीसंदर्भात त्रास होत असल्याने अनेक दिवसांपासून गोवंडीच्या लायन्स क्लब ऑफ बॉम्बे गोवंडी हेल्थ अॅण्ड एज्युकेशन सेंटर येथे उपचार घेत होती. बुधवारी दुपारी ही तरुणी चेकअपसाठी आली होती.
आरोपी डॉ. सुभाष सेहगल यांच्याकडे ही तरुणी तपासणी करून घेत असताना, ६४ वर्षीय सेहगल तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत गैरवर्तणूक केली. भयभीत तरुणीने आरडाओरडा करत केंद्रातून पळ काढला. हा प्रकार तरुणीने सोबत आलेल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. चेंबूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून डॉ. सुभाष सेहगल यांना अटक केल्याची माहिती पो. उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली.