अ‍ॅपशहर

चेतनला 'त्या' दोघींना संपवायचं होतं, चाकू घेऊन अंगावर गेला, पण...; ग्रँटरोडमध्ये काय घडलं?

grant road stabbing: तीन हत्या आणि दोन जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. चेतन गाला असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2023, 5:46 pm
मुंबई: तीन जणांची हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चेतन गाला नावाच्या आरोपीला परवा अटक केली. दक्षिण मुंबईतील ग्रँट रोडमध्ये वास्तव्यास असलेल्या चेतन गाला (५४) यांनी शुक्रवारी इमारतीमधील रहिवाशांवर चाकूनं वार केले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गालाला अटक केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai crime


ग्रँट रोडमधील जुन्या इमारतीत शुक्रवारी रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. चेतन गालाची पत्नी आणि मुलं त्याला सोडून जवळच असलेल्या एका इमारतीत राहत होती. आपल्या शेजाऱ्यांमुळे पत्नी, मुलं सोडून गेल्याचं चेतनला वाटत होतं. त्यामुळे त्याचा शेजाऱ्यांवर राग होता. चेतनची पत्नी अरुणा नेहमीप्रमाणे दुपारी चेतनला जेवणाचा डबा देण्यासाठी आली. त्यावेळी तिच्यासोबत तिची मुलगीदेखील होती. अरुणा आणि मुलांनी घरी परतावं यासाठी गेल्या ५० दिवसांपासून चेतनचे प्रयत्न सुरू होते. याच कारणावरून दोघांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला.
यातूनही वाचलास तर फास लाव! प्रियकराला विष देऊन प्रेयसीचा कॉल; तो अखेरच्या घटका मोजत राहिला
'चेतन आणि अरुणा वेगवेगळे राहतात. याच कारणावरून दोघांमध्ये शुक्रवारी दुपारी कडाक्याचं भांडण झालं. संतापलेल्या चेतननं सुरा काढला. तो लेकीवर धावून गेला. मात्र अरुणानं चेतनला मागे ढकललं. अरुणानं लेकीला वाचवलं आणि तिथून पळ काढला. यानंतर गाला त्याच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घरातून बाहेर आला. पत्नी आणि लेकीला शोधत तो शेजारी राहणाऱ्या मिस्त्रींच्या घरात शिरला,' अशी माहिती डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचं मिड डेनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
७ रुम, १२ बेड्स, १६ बाटल्या, 'ती' पाकिटं; प्रसिद्ध शाळेवर अचानक धाड; आत नेमकं काय चालायचं?
पुढच्या २० मिनिटांमध्ये चेतननं इलाबेन मिस्त्री (७०), त्यांचे पती जयेंद्रभाई (७७) आणि जेनिल ब्रह्मभट (१८) यांची हत्या केली. यापैकी जेनिल पहिल्या मजल्यावरून आली होती. कोलाहल ऐकून तिनं दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली होती. चेतननं तिलाही भोसकलं. त्यानं आठ वर्षांच्या मुलालादेखील भोसकण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत इमारतीखाली जमलेल्या लोकांनी चेतनच्या दिशेनं दगडफेक सुरू केली. इमारतीमधील रहिवासीदेखील चेतनच्या दिशेनं काठी, बॅट घेऊन धावले. त्यामुळे चेतननं मुलाला सोडून पळ काढला आणि तो घरात जाऊन लपला.

चेतननं स्वत:च्या घरात जाऊन कडी लावून घेतली. त्यानं कपडे बदलले. रक्तानं माखलेले कपडे लपवले. शेजाऱ्यांना भोसकण्यासाठी वापरलेला चाकूदेखील त्यानं दडवला आणि आम्हाला स्वयंपाकघरातील सुरी दिली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर पोलिसांनी घटनेचे व्हिडीओ तपासले. चेतननं दिलेलं हत्यार चुकीचं असल्याचं त्यातून पोलिसांच्या लक्षात आलं. त्यांनी त्याच्या घराची झडती घेतली. यावेळी पोलिसांच्या हाती चाकू लागला.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख