अ‍ॅपशहर

Eknath Shinde: कामाख्या मंदिरातील पुजाऱ्याने एकनाथ शिंदेंना काय सांगितलं होतं? शहाजीबापूंचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics | आम्ही गुवाहाटीत असताना एकनाथ शिंदे यांनी तेव्हाची राजकीय लढाई जिंकण्यासाठी कामाख्या देवीला साकडे घातले होते. त्यावेळी कामाख्या देवीचे पुजारी एकनाथ शिंदे यांना म्हणाले होते की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. त्यानुसार एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आम्ही आता नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला पुन्हा जात आहोत, असेही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Authored byरोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2022, 8:25 am

हायलाइट्स:

  • एकनाथ शिंदेंनी नुकतेच मिरगावमध्ये भविष्य जाणून घेतल्याची चर्चा होती
  • गुवाहाटीत असतानाही एका पुजाऱ्याने त्यांना भविष्य सांगितले होते
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shinde camp Guwahati visit
शिंदे गटाचा गुवाहाटी दौरा
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी आपल्या गटाचे ४० आमदार आणि अपक्षांसह गुवाहाटीला रवाना होत आहेत. कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९.३० वाजता शिंदे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांसह गुवाहाटीच्या दिशेने रवाना होतील. यानिमित्ताने मुंबई विमानतळावर दाखल होत असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये सध्या चांगलाच उत्साह दिसत आहे. गेल्या काही दिवसांमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धार्मिक दौरे हे सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. अलीकडेच त्यांनी नाशिकमध्ये एका ज्योतिषाला हात दाखवून भविष्य जाणून घेतल्याची चर्चा होती. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.
राज्यात सत्तांतराच्या घडामोडी सुरु असताना आम्ही गुवाहाटीत होतो तेव्हा कामाख्या देवीच्या मंदिरातील पुजाऱ्याने एकनाथ शिंदे यांचे भविष्य सांगितले होते, असे शहाजीबापू यांनी सांगितले. ते 'टीव्ही ९ मराठी' वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की, आम्ही गुवाहाटीत असताना एकनाथ शिंदे यांनी तेव्हाची राजकीय लढाई जिंकण्यासाठी कामाख्या देवीला साकडे घातले होते. त्यावेळी कामाख्या देवीचे पुजारी एकनाथ शिंदे यांना म्हणाले होते की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. त्यानुसार एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आम्ही आता नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला पुन्हा जात आहोत, असेही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे देवदर्शनाला, उद्धव ठाकरे जनतेच्या दरबारात; महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हायव्होल्टेज दिवस

शिंदे गटातील 'हे' पाच आमदार गुवाहाटीला जाणार नाहीत; नक्की काय घडलं?



शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार हे गुवाहाटीला जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे पाच आमदार हे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, महेंद्र दळवी आणि संजय गायकवाड यांचा समावेश आहे. मतदारसंघातील पूर्वनियोजित कामांमुळे आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचे संबंधित आमदारांनी स्पष्ट केले आहे.


मुख्यंत्र्यांनी मिरगावमध्ये हात दाखवून भविष्य पाहिल्याची चर्चा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यानुसार ते मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र अचानक त्यांचा ताफा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या दिशेने रवाना झाला. या कार्यक्रमाबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. याठिकाणी एकनाथ शिंदे यांनी एका ज्योतिषाला भेटून भविष्य जाणून घेतल्याची चर्चा आहे. यावरुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चाही झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला होता.दैनंदिन काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वासा धक्का बसल्याची लक्षणे आहेत. जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली होती.
लेखकाबद्दल
रोहित धामणस्कर
रोहित धामणस्कर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | लोकसत्ता, झी २४ तास, टीव्ही ९ मराठीसह डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ९ वर्षांचा अनुभव | सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख