अ‍ॅपशहर

चार वर्षाच्या चिमुकलीला नवे हृदय

शेतकऱ्याची मुलगी असलेल्या चार वर्षाच्या एका चिमुकलीवर शुक्रवारी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मूळची जालन्याची रहिवासी असलेल्या या मुलीला औरंगाबाद येथील तेरा वर्षांच्या ब्रेन डेड मुलाकडून हृदय मिळाले आहे.

Maharashtra Times 24 Jun 2018, 9:15 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Heart-Transported

शेतकऱ्याची मुलगी असलेल्या चार वर्षाच्या एका चिमुकलीवर शुक्रवारी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मूळची जालन्याची रहिवासी असलेल्या या मुलीला औरंगाबाद येथील तेरा वर्षांच्या ब्रेन डेड मुलाकडून हृदय मिळाले आहे.

मुलगी उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. सध्या ती डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली असल्याचे फोर्टीस रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ अन्वय मुळ्ये यांनी सांगितले.

जालन्यातील या चार वर्षांच्या मुलीला गेल्या वर्षी कार्डिओमाओपथी नावाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. या आजारात हृदयाकडून शरीराच्या इतर भागांत रक्तपुरवठ्याला अडथळा निर्माण होतो. या मुलीच्या कुटुंबीयाने मे महिन्यात हृदय प्रत्यारोपणासाठी नाव नोंदवले होते. शुक्रवारी औरंगाबाद येथे रस्ते अपघातात तेरा वर्षांच्या मुलाला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. या मुलाच्या पालकांची परवानगी मिळताच त्याचे मृत्युपश्‍चात उपलब्ध झालेले हृदय फोर्टिस रुग्णालयातील चार वर्षांच्या मुलीसाठी पाठवण्याचा निर्णय झाला. अवघ्या दीड तासांत औरंबादहून चार्टर्ड विमानाने ते मुंबईत आणि मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार करून पाठवण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज