अ‍ॅपशहर

उच्च शिक्षणाचा ‘महामार्ग’ गाठायचाय!

shruti thaksen patekar९५८० %म टा प्रतिनिधी, मुंबईघाटकोपर पूर्वेकडील सिद्धरामेश्वर नगर चाळ क्रमांक ३६च्या मागे एकमेकांना खेटून असलेली घरं...

Maharashtra Times 12 Jul 2018, 4:49 pm
shruti thaksen patekar
महाराष्ट्र टाइम्स.कॉम high school is going to be the highway
उच्च शिक्षणाचा ‘महामार्ग’ गाठायचाय!


९५.८० %

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

घाटकोपर पूर्वेकडील सिद्धरामेश्वर नगर. चाळ क्रमांक ३६च्या मागे एकमेकांना खेटून असलेली घरं...चाळीतील चिंचोळ्या रस्त्यातून मार्ग काढत जायचं. एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकेल अशी बिकट वाट. आतापर्यंतचा श्रृतीचा प्रवास याच चिंचोळ्या वाटेवरून झालेला. या वाटेतून बाहेर पडून आता तिला महामार्गावर यायचंय...हा महामार्ग आहे उच्च शिक्षणाचा. महामार्गाचा प्रवास ध्येयाच्या जवळ नेतो, पण त्यासाठी आर्थिक जुळणी कशी करायची या विवंचनेतील सध्या पाटेकर कुटुंब आहे.

श्रृती ठकसेन पाटेकर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी. इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर व्हायचं स्वप्न ती बघतेय. आठ हजार रुपये पगारात स्वत:सह तीन बहिणींच्या शिक्षणाचा खर्च, त्याचबरोबर घरगाडा चालवताना वडिलांची होणारी दमछाक तिच्या डोळ्यासमोर आहे. वडिलांना तोशीस पडू नये म्हणून गुण असूनही तिनं अकरावी-बारावीकडे न जाता डिप्लोमाला प्रवेश घ्यायचं ठरवलंय! पण त्यासाठी लागणारा पैसाही उभा कसा करायचा, हा प्रश्न आहे.

समंजस जिद्दीची कहाणी...५

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज