योद्धयांना मानवंदना
'आर्मी डे' निमित्त कुलाबा लष्करी तळावर बुधवारी शहीद स्मारकावर लष्करातील योद्ध्यांना मानवंदना देण्यात आली. लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा क्षेत्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. प्राशर यांनी अफगाण चर्चजवळील शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी शीख रेजिमेंटच्या जवानांनी मानवंदना दिली.