अ‍ॅपशहर

उद्धव यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांवर मनी लाँडरिंगचा जो आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे तो गंभीर आहे आणि याबाबत त्यांनी योग्य यंत्रणेकडे तक्रार केल्यास त्या यंत्रणेमार्फत नक्कीच या प्रकरणी चौकशी होईल, असे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Maharashtra Times 20 Feb 2017, 4:04 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम if kirit somaiya file complaint against uddhav thackeray then appropriate agency will be taken action says cm fadnavis
उद्धव यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार?


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांवर मनी लाँडरिंगचा जो आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे तो गंभीर आहे आणि याबाबत त्यांनी योग्य यंत्रणेकडे तक्रार केल्यास त्या यंत्रणेमार्फत नक्कीच या प्रकरणी चौकशी होईल, असे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मनी लाँडरिंगप्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ज्या कंपन्यांमधून मनी लाँडरिंग केलं होतं त्याच कंपन्यांमधून उद्धव ठाकरे यांनी मनी लाँडरिंग केल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव यांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी, असं आव्हानही सोमय्या यांनी मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वेळोवेळी दिलं आहे. उद्धव यांचे सात कंपन्यांशी संबंध असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'एबीपी माझा'शी बोलताना याप्रकरणी चौकशी होऊ शकते, असे सांगून सनसनाटी निर्माण केली.

मुख्यमंत्री म्हणाले, 'किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी काही कंपन्यांची कागपत्रं दाखवली आहेत. या कंपन्यांमध्ये मनी लाँडरिंग झालं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी उद्धव यांनाही जाहीरपणे याबाबत विचारलं आहे. या कंपन्यांशी शिवसेना नेत्यांचा संबंध आहे का आणि असतील तर ते नेते कोण आहेत? त्यांच्यावर कारवाई करणार आहात का? असे सोमय्यांचे प्रश्न आहेत.'

अशा गोष्टी ज्या तुमच्याकडे पुराव्यानीशी आहेत त्याचा राजकीय उपयोग करू नका. संबंधित यंत्रणेकडे ती कागदपत्रं सोपवा. ती यंत्रणा त्याबाबत कारवाई करेल, असा सल्ला आपण सोमय्या यांना दिला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले.

भुजबळांची जशी ईडीने चौकशी केली तशी चौकशी उद्धव आणि शिवसेनेच्या नेत्यांची होणार का?, असं मुख्यमंत्र्यांना विचारलं असता मी तसं म्हटलेलं नाही पण जर खरंच मनी लाँडरिंग झालं असेल तर चौकशी होईलच, असे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज