अ‍ॅपशहर

...तर रस्ते घोटाळ्याची सीबीआय चौकशी

मुंबई महापालिकेमार्फत रस्ते विकास, सुधारकामात अनियमितता आढळून आल्याने चौकशीत दोषी असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच मागील कालावधीतील पाच कोटींवरील रकमेच्या २०० रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने कडक कारवाई करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. तसेच, विरोधकांच्या आग्रहावरून या प्रकरणी गरज पडल्यास सीबीआयमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Maharashtra Times 29 Jul 2016, 6:09 am
नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे आश्वासन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम if needed corruption in road construction will be probed by cbi
...तर रस्ते घोटाळ्याची सीबीआय चौकशी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेमार्फत रस्ते विकास, सुधारकामात अनियमितता आढळून आल्याने चौकशीत दोषी असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच मागील कालावधीतील पाच कोटींवरील रकमेच्या २०० रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने कडक कारवाई करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. तसेच, विरोधकांच्या आग्रहावरून या प्रकरणी गरज पडल्यास सीबीआयमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

शिवसेना-भाजप युतीची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात कंत्राटदार, महापालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र या मोठ्या घोटाळ्यांची रक्कम कमी दाखवण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी लक्षवेधी सूचनेवर बोलताना केला.

या प्रकरणाची चौकशी सीबीआय, कॅगमार्फत व्हावी, अशी विरोधी सदस्यांची मागणी होती. तेंव्हा सध्या चौकशी सुरू असून चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास विरोधकांच्या मागणीचा विचार करू, असे आश्वासन पाटील यांनी दिले.

मुंबई महापालिकेकडून ५ कोटी रुपयांवरील रस्त्यांची चौकशी करण्यात येत असून पाच रस्त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. तसेच आणखी सुमारे २०० रस्त्यांची चौकशीही करण्यात येते आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज