अ‍ॅपशहर

...तर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल: उद्धव

पदवीधर निवडणुकीत मिळालेल्या विजयाचं श्रेय शिवसैनिकांचं असल्याचं सांगत, यापुढे असंच जर आपण लढत राहिलो तर, मुख्यमंत्री होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2018, 9:36 pm
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav-thackeray


पदवीधर निवडणुकीत मिळालेल्या विजयाचं श्रेय शिवसैनिकांचं असल्याचं सांगत, यापुढे असंच जर आपण लढत राहिलो तर, मुख्यमंत्री होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विलास पोतनीस आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत किशोर दराडे विजयी झाल्याबद्दल रंगशारदा सभागृहात विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. ते म्हणाले, की 'हा विजयी सत्कार माझा किंवा पोतनीस यांचा नाही, तर तो सर्व शिवसैनिकांचा आहे. हा विजय मी शिवसैनिक आणि मतदारांना अर्पण करतो,' असं ठाकरे म्हणाले.

यावेळी आपण चारही मतदारसंघातील निवडणूक लढलो. आता यापुढे फक्त लढायचे आणि जिंकायचे. लढलो नाही तर आपल्याला अंदाज येणार नाही. आपण लढत राहिलो तरच, आपण मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं आहे, ते पूर्ण होईल. तुमच्यासारखे शिवसैनिक एकत्र आले तर तेही स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज