अ‍ॅपशहर

महिलांचा प्रवास सुरक्षेच्या दिशेने; मागील वर्षाच्या तुलनेत मध्य रेल्वेवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये घट

जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत केवळ ७६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ६० आरोपींना बेड्या ठोकण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. लोकलमध्ये महिला संबंधित गुन्ह्यांचा आकडा २०१९ मध्ये एकूण ११३ इतका होता

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 31 Dec 2022, 7:58 am
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लाखो महिला प्रवाशांसंबंधित गुन्ह्यांच्या घटना कमी झालेल्या आहेत. २०१९ वर्षाच्या तुलनेत यंदा महिला गुन्हेगारीच्या घटनेत सुमारे ३० टक्क्यांनी घट झालेली आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त उपक्रमांमुळे महिलांचा रेल्वे प्रवास हळहळू सुरक्षिततेच्या दिशेने सुरू झाला आहे. विशेष म्हणजे बहुतांश गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्यातही रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman coach
महिलांचा प्रवास सुरक्षेच्या दिशेने; मागील वर्षाच्या तुलनेत मध्य रेल्वेवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये घट


सन २०२२मध्ये वर्षीच्या महिला सुरक्षेसाठी मेरी सहेली, स्मार्ट (सर्बबन मुंबई अॅर्सेटिव्ह रेल ट्रॅव्हरल) आणि महिला डब्यात पोलिसांकडून गस्त या सारखे उपक्रम सुरू आहेत. यामुळे २०१९ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी गुन्हे कमी झाले आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. लोकलच्या महिला डब्यात मारहाण, आसन पकडण्यावरून बाचाबाची, गदुर्ल्यांकडून छेडछाड, महिलांवर शेरेबाजी करणे, महिला प्रवाशांवर अतिप्रसंग करणे या आणि अन्य गुन्ह्यांखाली रेल्वे कायद्यानुसार आरपीएफकडून कारवाई करण्यात येते.

जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत केवळ ७६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ६० आरोपींना बेड्या ठोकण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. लोकलमध्ये महिला संबंधित गुन्ह्यांचा आकडा २०१९ मध्ये एकूण ११३ इतका होता. या पैकी ९७ प्रकरणांची उकल करण्यास आरपीएफ प्रशासनाला यश आले. यात एकूण १०७ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

वर्ष - २०१९-२०२०-२०२१-२०२२ (नोव्हेंबरपर्यंत)

प्रकार - नोंद-अटक/ नोंद-अटक/ नोंद-अटक/नोंद-अटक

बलात्कार -०६-०४- ०१-००- १०-१६- २-१

अन्य गुन्हे - ११७-१०३- ४०-३२- २१-२१- ७४-५९

(स्रोत- रेल्वे सुरक्षा दल, मध्य रेल्वे)

महिला सुरक्षेसाठी सुरू असलेल्या उपाययोजना

- मेरी सहेली : आरपीएफ आणि महिला प्रवासी यांचा समावेश असलेले ५२ ‘मेरी सहेली’चे संघ बनविण्यात आले आहेत.

- स्मार्ट : या उपक्रमांतर्गत महिला रेल्वे प्रवाशांना प्रत्यक्ष वेळेत मदत पुरविण्यात येते.

- मार्गदर्शक : महिला डब्यांतून नियमित प्रवास करणाऱ्या ७०० जणांची महिला मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करून आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपसोबत जोडण्यात आले आहेत.

- पोलिस : महिला डब्यात रात्री ९ ते सकाळी ६पर्यंत रेल्वे पोलिसांकडून सुरक्षा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज